मनेबल उंचावलेल्या यूपी वॉरियर्सचा सामना आज मुंबईशी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
‘आरसीबी’विऊद्धच्या सुपरओव्हरमधील रोमांचक विजयामुळे उत्साह वाढलेला यूपी वॉरियर्स संघ आज बुधवारी येथे महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना करणार असून यावेळी आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न ते करतील. वॉरियर्सने सोमवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्ध शानदार विजय मिळवला. त्यात सोफी एक्लेस्टोनने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्हीमध्ये सामना जिंकून देणारी कामगिरी केली.
तथापि, पुन्हा एकदा अडचणीत न येण्याच्या दृष्टीने यूपी वॉरियर्सला त्यांच्या फलंदाजांकडून अधिक चांगल्या कामगिरीची आवश्यकता भासेल. दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध चिनेल हेन्रीने त्यांच्या विजयी मोहिमेचे नेतृत्व केले, मागील विजयात एक्लेस्टोनने प्रमुख भूमिका बजावली. सलामीवीर किरण नवगिरे आणि श्वेता सेहरावत यांनी आशादायक कामगिरी केलेली असली, तरी त्यांना त्यांच्या चांगल्या सुऊवातीचा फायदा घेता आलेला नाही. सलामीवीर वृंदा दिनेश आणि कर्णधार दीप्ती शर्मा यांना मधल्या फळीत स्थिरता द्यावी लागेल.
या हंगामाची सुऊवात कठीण राहिलेली असली, तरी वॉरियर्सने सलग पराभवांतून पुनरागमन केले आहे आणि दोन उल्लेखनीय विजय नोंदवले आहेत. तथापि त्यांच्या फलंदाजांना, विशेषत: सलामीवीर आणि मधल्या फळीला सातत्य राखण्यात संघर्ष करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू तहलिया मॅकग्रा ही वॉरियर्स संघातील आणखी एक मॅचविनर आहे. तिच्याकडे फटकेबाजीची स्फोटक क्षमता असली, तरी तिला अद्याप स्पर्धेत चमक दाखविता आलेली नाही. मुंबईविरुद्ध असुरक्षित स्थिती वाट्याला येऊ नये म्हणून मॅकग्रा आणि उर्वरित फलंदाजांना प्रभावी कामगिरी करावी लागेल.
मुंबई इंडियन्ससाठी नॅट सायव्हर-ब्रंट ही उत्कृष्ट कामगिरी करत आली आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिने आरसीबीविऊद्धच्या मागील सामन्यात अर्धशतक झळकावले होते. फलंदाजी ही मुंबईची ताकद आहे. त्यांच्याकडे हेली मॅथ्यूज आणि अॅमेलिया केरसारख्या विध्वंसक फलंदाज आहेत, परंतु दोघांनीही आतापर्यंत फारशी प्रभावी कामगिरी केलेली नाही. सलामीवीर यास्तिका भाटियालाही मोठ्या डावाची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे 16 वर्षीय जी. कमलिनी ही उदयोन्मुख स्टार देखील आहे. आरसीबीविऊद्ध विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या अमनजोत कौरची अष्टपैलू कामगिरी हे मुंबईसाठी चांगले लक्षण आहे. संघाच्या माऱ्याचे नेतृत्व शबनीम इस्माइल आणि सायव्हर-ब्रंट यांनी केले असून कोणत्याही फलंदाजी विभागाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.