For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोल्ड ‘ईटीएफ’द्वारे गुंतवणुकीमधून 17 टक्क्यांपर्यंत परतावा

06:54 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोल्ड ‘ईटीएफ’द्वारे गुंतवणुकीमधून 17 टक्क्यांपर्यंत परतावा
Advertisement

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड’ किंवा ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सोन्याने 65,500 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी ओलांडली आहे आणि आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. तज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांत त्यात वाढ होऊ शकते आणि या वर्षाच्या अखेरीस ती 70 हजारांवर जाऊ शकते.यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ‘गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड’ किंवा ‘गोल्ड ईटीएफ’ मध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. गेल्या 1 वर्षात 17 टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे.  एक्सचेंज ट्रेडेड फंड सोन्याच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींवर आधारित असतात. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे 1 ग्रॅम सोने. तेही पूर्णपणे शुद्ध. गोल्ड ईटीएफ शेअर्स प्रमाणे बीएसई आणि एनएसईवर खरेदी आणि विक्री करता येते. मात्र, यामध्ये तुम्हाला सोने मिळत नाही. जेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल, तेव्हा तुम्हाला सोन्याच्या किमतीएवढे पैसे मिळतील.

Advertisement

गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीचे  फायदे 

कमी प्रमाणातही सोने खरेदी करू शकता:

ईटीएफद्वारे सोने युनिटमध्ये खरेदी केले जाते, जेथे एक युनिट एक ग्रॅमचे असते. यामुळे कमी प्रमाणात किंवा सिप (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे सोने खरेदी करणे सोपे होते.

शुद्ध सोने मिळवा: सोन्याच्या ईटीएफची किंमत पारदर्शक आणि एकसमान आहे. गोल्ड ईटीएफद्वारे खरेदी केलेले सोने 99.5 टक्के शुद्धतेची हमी देते, जी शुद्धतेची सर्वोच्च पातळी आहे.

दागिने बनवण्याचा खर्च नाही

पोर्टफोलिओ व्यवस्थापित करण्यासाठी 1 टक्के वार्षिक शुल्कासह गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी 1 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेज आकारले जाते.

इलेक्ट्रॉनिक सोने डिमॅट खात्यात ठेवले जाते ज्यामध्ये फक्त वार्षिक डीमॅट शुल्क भरावे लागते. तसेच चोरीची भीती नाही. भौतिक सोन्याच्या चोरीच्या धोक्याशिवाय त्याच्या सुरक्षिततेवरही खर्च करावा लागतो.

Advertisement
Tags :

.