कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘यूपी रुद्राज’ची हॉकी इंडिया लीगमधून माघार

06:22 AM Sep 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हॉकी इंडिया लीगची (एचआयएल) फ्रँचायझी यूपी ऊद्राज यांनी सोमवारी सांगितले की, ते या स्पर्धेतून माघार घेत आहेत कारण आर्थिक आव्हानांमुळे त्यांना स्पर्धेत खेळणे अशक्य झाले आहे.

Advertisement

संघाने हा एक कठीण निर्णय असल्याचे म्हटले आहे. ‘हा सोपा निर्णय नव्हता’, असे संघ संचालक सेड्रिक डिसोझा यांनी म्हटले आहे. लीगने भारतीय हॉकीमध्ये जी स्थिती आणली आहे ती आम्हाला महत्त्वाची वाटते, परंतु टिकून राहण्याच्या आव्हानांमुळे आम्हाला पुढे चालू ठेवणे कठीण बनले आहे. आता आमची जबाबदारी जिथे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतील अशा दिशेने संसाधनांना वळविणे, तळागाळातील विकास साध्य करणे ही असेल, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

रुद्राजने अधोरेखित केले आहे की, पुढे त्यांचे लक्ष भारतात हॉकीसाठी मजबूत पाया तयार करणे, शाळा आणि समुदाय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे, गुणवान खेळाडूंना लवकर ओळखण्यासाठी स्काउटिंग आणि प्रशिक्षण उपक्रम राबविणे आणि विकासासाठीचे व्यासपीठ तयार करणे यावर असेल. हॉकीमधील प्रतिभेचा प्रवाह मजबूत राहील आणि लीगबाहेरील खेळाडूंना संधी उपलब्ध होतील याची खात्री करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार आणि यूपी रुद्राजचा स्टार खेळाडू हार्दिक सिंगने म्हटले आहे की, हॉकी इंडिया लीगमध्ये रुद्राजचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान होता. आमचे चाहते अढळ निष्ठेने आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. हा अध्याय संपत असताना हॉकी आणि भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा देण्याकडील आमचे समर्पण तळागाळाच्या पातळीवर सुरूच राहील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article