Satara : तळबीडमध्ये भगव्या ध्वजाचे अनावरण
तळबीड ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय
उब्रज: अयोध्या येथील श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाचा उत्साह आणि प्रेरणा संपूर्ण देशभरात पसरत असताना, त्याच धर्तीवर तळबीड ग्रामस्थांनीही ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होत भगवा ध्वज अभिमानाने फडकावला. तळबीड येथील श्रीराम मंदिराच्या आवारात आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. मंदिराचे संकल्पमूर्ती परमपूज्य साईकिरणबाबा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
ध्वजारोहणासाठी सकाळपासूनच श्रीराम मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. श्रीरामनामाच्या घोषणा, गुलाल, फटाके आणि जय श्रीरामच्या जयघोषात भगवा ध्वज आकाशात दिमाखाने फडकवण्यात आला. गावातील महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
यावेळी महेश जाधव, उमेश मोहिते, तळबीडच्या सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच संगीता मोहिते, राजेंद्र मोहिते, अमोल पवार, माजी उपसरपंच दादासाहेब मोहिते, कराड तालुका भाजपा अध्यक्ष योगीराज सरकाळे, ग्रामपंचायत सदस्य विशाल मोहिते, संजय मोहिते, विनोद मोहिते, अभय मोहिते, किशोर मोहिते, राकेश थोरात, प्रवीण नलावडे, महेश कचरे, सुधाकर कोकीळ, महादेव गायकवाड, विकास यादव, सुनील मोहिते, उपसरपंच इंदुताई शिंदे, अक्षय मोहिते, ग्रामपंचायत सदस्या वैशाली पाडळे, सविता कुंभार तसेच तळबीडमधील रामभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता श्रीराम आरतीने करण्यात आली. तळबीड गावातील तरुणांनी मंदिर परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. तळबीडमधील हा सोहळा ऐतिहासिक ठरला.