महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सायबर क्राईम मॉड्यूलचा पर्दाफाश

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बनावट कॉल सेंटरवर सीबीआयचा छापा : दोन कोटी ऊपये जप्त

Advertisement

 वृत्तसंस्था /दिल्ली, अहमदाबाद

Advertisement

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमधील बनावट कॉल सेंटर्सवर छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. 24 ठिकाणी शोध घेऊन सायबर क्राईम मॉड्यूलचा पर्दाफाश करताना सीबीआयने छापेमारीत 2 कोटी 20 लाखांची रोकड जप्त केली. दिल्ली, गुऊग्राम, नोएडा आणि गुजरातमध्ये तपासादरम्यान या सायबर क्राईम मॉड्यूलशी संबंधित डिजिटल पुरावे, क्रिप्टोकरन्सी आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांसह रोख रक्कम सापडल्याचे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. हे प्रकरण परदेशी नागरिकांची फसवणूक करण्याशी संबंधित असल्याचा दावाही करण्यात आला. सदर क्राईम मॉड्यूल अंतर्गत ई-संपर्क सॉफ्टटेक कंपनी अमेरिकन सरकारी एजन्सी असल्याचे भासवून अमेरिकन लोकांची फसवणूक करत असे. याप्रकरणी कंपनीचे संचालक गौरव गुप्ता आणि सुशील सचदेवा यांच्याविऊद्ध सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अमेरिकन सरकारी एजन्सीच्या नावावर फसवणूक

या प्रकरणात 7 जुलै 2022 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये भारतातील अनेक कॉल सेंटर्सनी अमेरिकन नागरिकांना टार्गेट करून लाखेंची फसवणूक केली. त्यासाठी गुजरातच्या एका कंपनीच्या मदतीने आरोपींनी अमेरिकन लोकांना रोबो आणि ऑडिओ कॉल करून पैसे मागितले. हे करण्यासाठी आरोपींनी यूएस ग्रँट डिपार्टमेंट, इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस (आयआरएस), सोशल सिक्मयुरिटी अॅडमिनिस्ट्रेशन (एसएसए), कम्युनिटी रिइन्व्हेस्टमेंट अॅक्ट (सीआरए), एअर ट्रॅफिक ऑर्गनायझेशन (एटीओ) यांसारख्या अमेरिकन सरकारी संस्थांची नावे वापरल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सीबीआय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एकदा अमेरिकन लोकांना पकडल्यानंतर आरोपी त्यांना बँक खात्याचे तपशील आणि ओळखपत्रे विचारायचे आणि पैसे, दंड किंवा कर अशा मागण्या करायचे. याद्वारे ते लोकांना पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडायचे. आरोपींनी अमेरिकन नागरिकांकडून 20 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 166 कोटी 66 लाख ऊपये) जप्त केले. हा घोटाळा 2015 पासून सुरू असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून याप्रकरणी सीबीआयसह अन्य यंत्रणांकडून समांतर तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article