महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अवकाळीने शेतकऱ्यांची वाढविली चिंता

10:54 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ढगांच्या गडगडाटाने भरली धडकी : कसली दिवाळी अन् कसला सण : केवळ विचार पिकांचा

Advertisement

वार्ताहर/येळ्ळूर 

Advertisement

भरून आलेले आभाळ, पावसाचे पडणारे थेंब, ढगांचा गडगडाट आणि शेतात कापून पडलेले भात, गेल्या दोन दिवसांचे येळ्ळूर परिसरातील चित्र असून अशा वातावरणामुळे शेतकरी सैरवैर झाला आहे. कापून टाकलेले भात जमा करून वळी घालण्यासाठी त्यांची धडपड सुरू असून हे करताना त्यांची दमछाक होते आहे. काहींनी भात जमा केले तर काहींचे अर्धवट राहिले. यामुळे पुन्हा त्यांची धगधग वाढली आहे. मागील आठवड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. यामुळे शेतकरीवर्ग सावरला होता. पक्व झालेल्या पिकाची कापणी करून वळ्या घातल्या की, भात सुरक्षित झाले, निवांतपणे मळणी करून दाणे घरी नेता येतात, या भावनेने तो सुखावला होता. पण हे सुख निसर्गाने क्षणभंगूर केले. गेल्या दोन दिवसांपासून आकाश काळवंडून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत पडला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीआधी हंगाम साधण्यासाठी मिळतील तेवढ्या मजुरांसोबत सुगीला सुरुवात केली होती. काहींनी पुढील कामाच्या योजनाही घातल्या होत्या. कांहीनी भात कापून ते वाळण्यासाठी पसरले होते. पण पुन्हा आकाश काळवंडून पावसाला सुरुवात झाल्याने कापलेले भात पुन्हा भिजण्याआधी जमा करण्याची धडपड सुरू झाली. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी भात कापणी करून सायंकाळी लगभगीने दिवाळी फराळ करण्यासाठी घरी परतण्याचे चित्र बघता शेतकऱ्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार. पण पावसामुळे कसली दिवाळी आणि कसला सण म्हणण्याची वेळ आली आहे. गोडधोड राहिले बाजूला शेतातील पीक कसे काढावे याच विचाराने त्याचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. आतापर्यंत प्रत्येकवेळी ऐन हंगामात पावसाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article