Sangli : अवकाळी पावसाचा पुन्हा द्राक्षबागांना झटका
विसापूर, हातनूर, मांजर्डेसह संपूर्ण तासगाव तालुक्यातील चित्र
by संजय पाटील
हातनूर : ऐन दिवाळीत व दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा तासगाव पूर्व भागावर अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने द्राक्ष बागायतदार चांगलाच अडचणीत सापडला आहे. पोंगा अवस्थेत व त्यापुढे असलेल्या द्राक्ष बागांमध्ये सुरु असलेल्या अवकाळी पावसाने दावणी, करप्याने जोरदार शिरकाव केल्याने शेतकरी मुबलक महाग औषधे मारूनही काही उपयोग होत नसल्याने बागा सोडून देण्याच्या मनस्थितीत असल्याचे चित्र आहे.
तासगाव पूर्व भागावर पुन्हा एकदा दिवाळीच्या आठ दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. ज्यांनी छाटणी घेतल्या आहेत त्यांच्या द्राक्षबागा फुटू लागल्या आहेत त्याच द्राक्षबागांना आता दावण्या फुलगळ करपा या रोगाचा मोठा फटका बसत असल्याचे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
तसेच ज्या बागा फुटून फ्लोरिंग स्टेजमध्ये आहेत. त्या भागांना मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून मोठ्या आर्थिक नुकसानीचे झळ बसणार असल्याचे दिसत आहे. मे महिन्यापासून सुरू असलेला पाऊस द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची पाठ धुवूनच मागे लागल्यासारखी झाले आहे.
आता यातून वाचलेले फळ छाटणी घेऊन कुठेतरी घातलेला खर्च तरी निघेल या आशेवर होता परंतु या आशेवरही आता सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे पाणी फिरणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तासगाव तालुका द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखले जाते परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून पावसाच्या अनियमिततेमुळे या पंढरीतील शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्णपणे मोडून गेल्यासारखे झाले आहे.
त्यामुळे अनेक द्राक्ष बागायतदार द्राक्ष बागा काढून टाकण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत. गेल्या चार वर्षांपासून सतत द्राक्ष शेतीवर अस्मानी संकटे येत आहेत. यावर्षीही सुरवाती पासूनच पाऊस सुट्टी देत नसल्याने अनेक शेतक्रयांनी बाग काढण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत, तशा प्रतिक्रिया येत आहेत.
अवकाळीचा मोठा फटका..
द्राक्षबागायतवार छाटणी घेतल्यानंतर फुटून आलेल्या दाक्षबागांना या पावसामुळे करपा, वावण्या यासारखं रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो व यामध्ये द्राक्षबाग पूर्णपणे रोगाला बळी पडून वाया जाण्याची वाट शक्यता असते. या रोगावर कितीही औषधे फवारणी केल्या तरी वावण्या, करपा हे रोग आटोक्यात येत नाहीत. त्यामुळे या अवकाळीचा फटका द्राक्ष बागायतवारांना मोठ्या आर्थिक संकटात टाकणार अशी प्रतिक्रिया हातनूरचे दाक्ष बागायतवार शेतकरी मच्छिंद्र पाटील मानी वैनिक तरुण भारत सवावशी बोलताना विली.