हत्तीची विनापरवाना वाहतूक रोखली; वनविभागाची कारवाई : हत्ती ताब्यात
: शेडबाळच्या संस्थेवर गुन्हा दाखल
कुपवाड प्रतिनिधी
नांद्रे येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी हत्तीची विनापरवाना वाहतूक करीत असताना पकडण्यात आले. सांगली वनविभागाच्या फिरत्या पथकाने रविवारी सायंकाळी माधवनगर येथे ही कारवाई केली. या कारवाईत हत्ती ताब्यात घेवून याप्रकरणी शेडबाळ (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार श्री शांतीसागर दिगंबर जैन क्षेत्राश्रम यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला, अशी माहिती वनविभागामार्फत देण्यात आली. याबाबत माहिती अशी, हत्ती या वन्यजीव प्राण्याची परराज्य अथवा जिल्ह्यात अन्यत्र कुठेही वाहतूक करीत असताना वनविभागाचा रितसर परवाना घेण्याची आवश्यकता असते. हत्ती हा शेड्यूल एकमधील वन्यजीव आहे. त्यामुळे परवानगी शिवाय हत्तीची कुठेही बेकायदा वाहतूक करणे, कायद्याने गुन्हा आहे. रविवारी सायंकाळी नांद्रे येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी शेडबाळ येथील क्षेत्राश्रमाच्या हत्तीची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती सायंकाळी वनविभागाच्या फिरते पथकाला मिळाली. त्यानुसार उपवनसंरक्षक नीता कट्टे व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गर्दशनाखाली वनक्षेत्रपाल महांतेश बगले यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाने माधवनगर जकात नाक्याजवळ मुख्य रस्त्यावर रा†ववारी सायंकाळी सातच्या सुमारास सापळा रचला. यावेळी ट्रकमधून हत्तीची वाहतूक होत असताना आढळून आले.
पथकाने ट्रक अडवून तपासणी केली असता संबंधित वाहतूकदारांकडे हत्ती वाहतूक करण्यासाठी कोणताही रितसर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने ट्रकसह हत्तीला वनविभागाने ताब्यात घेतले. सोमवारी श्री शांतीसागर दिगंबर जैन क्षेत्राश्रम यांच्यावर वन्यजीव संरक्षण आ†धा†नयमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत वनपाल राजाराम तिवडे, अजितकुमार दगडे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, सचिन साळुंखे यांनी सहभाग घेतला.