For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलकापूर- अणुस्कुरा मार्गावर अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने एक ठार

07:37 PM Apr 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
मलकापूर  अणुस्कुरा मार्गावर अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने एक ठार
Malkapur-Anuskura
Advertisement

शाहूवाडी प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर - अणुस्कुरा राज्य मार्गावरील माण गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने माण ग्रामपंचायतीचे सदस्य तानाजी मलू कस्तुरे वय 3४ या युवकाचा जागीच मुत्यू झाला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे.ही घटना रविवारी रात्री  घडली.

Advertisement

माण पैकी धनगर वाडयावरील ग्रामपंचायत सदस्य तानाजी मलू कस्तुरे हे गिरगाव येथील आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी आपल्या मोटार सायकल वरून  मलकापूर - अणुस्कुरा राज्य मार्गावरून जात होते. मोटार सायकल माण धनगर वाडया पासून एक किलो मीटर अंतरावरून जात असताना पाठीमागुन अज्ञात वाहनाने जोराची धडक  तानाजी कस्तुरे यांच्या मोटारसायकला दिल्याने ते जागीच ठार झाले.या घटनेची महिती माण धनगर वाड्यावरील नागरीकांना समजताच त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ते मयत झाल्याचे घोषित केले.रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पाश्चात आई ,भाऊ,पत्नी दोन मुले असा परिवार आहे. तानाजी मलुसरे यांच्या मुत्यूने माण धनगर वाड्यावर शोककळा पसरली आहे.

हसरा मनमिळावू स्वभाव
तानाजी कस्तुरे हा सर्वाशी हसत खेळत मिळून मिसळून वागणारा युवक होता. हॉटेलमध्ये नोकरी करत त्यांनी आपला उदरनिर्वाह चालू ठेवला होता . नुकत्याच झालेल्या माण ग्रामपंचायत मध्ये ते विजयी झाले होते .कष्टकरी मनमिळावू स्वभावाच्या तानाजी कस्तुरे यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती .

Advertisement

Advertisement
Tags :

.