आचरा येथील कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने केला विषप्रयोग
प्रकल्पातील 18 लाख किंमतीची कोळंबी झाली गतप्राण ; अज्ञाताविरोधात गुन्हा
आचरा प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील आचरा पारवाडी डोंगरेवाडी लगत चालू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे 18 लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व अंत्तोन फर्नाडीस, (रा- धुरीवाडा मालवण) यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली असून आचरा पोलिसांनी अज्ञाताविरोधात भा. न्या. सं. 2023 चे कलम 286,324(5) प्रमाणे विषारी पदार्थ टाकून मानवी जीविकास दुखा उत्पन्न होईल अशी कृती करून कोळंबी प्रकल्पातील कोळंबीचे नुकसान केल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 13 मे रोजी रात्री 11.00 ते 12.00 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. तक्रारी नंतर जिल्हा मुख्यालयातून फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती. या टीमने पाहणी केली असून गतप्राण झालेल्या कोळंबीचे व विषारी पदार्थाचे घटनास्थळी सापडलेले नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत .