महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संस्काराचे विद्यापीठ

06:50 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कलेचा ज्ञान देणारे किंवा कला शिकवणारी अनेक विद्यापीठे आहेत पण सुसंस्कार करणारे विद्यापीठ मात्र कुठेही नाही. अशा संस्कारांची विद्यापीठे कलेशी निगडित असलेली ज्ञानाबरोबर घडायला हवीत. कारण ज्ञानाने फक्त अहंकार वाढतो पण कल्पनाशक्ती आणि संवेदन शक्ती आम्ही घालून बसतो. अशावेळी मनाला अभिरुचीसंपन्न व सुसंस्कृत करायचे असेल तर कलेची विद्यापीठे पाहिजेतच. कलेच्या सानिध्यात माणसाला माणूसपण गवसतं. ज्ञानामुळे आम्हाला जगण्यासाठी पैसा जरी मिळत असला तरी जगण्यासाठी आवश्यक कला किंवा भान आम्हाला कलेमुळेच येते. अशी कलाकृती माणसाची जगण्याची अभिरुचीच बदलतात. माणसातला उत्तम नागरिक घडवतात. कलाकृतीची निर्मिती व त्याचा आस्वाद हे जगण्याचे दोन राजेशाही मार्ग आहेत आणि असे मार्गच उत्तम राष्ट्र घडवतात. रस्त्यात पडलेला दगड खूप जण ओलांडून पुढे जातात. पण एखादा मूर्तिकार मात्र त्या दगडातून विलक्षण असं काहीतरी निर्माण करतो. त्याच्या मनातल्या कल्पनांची ती खरं प्रतिक्रिया उमटलेली असते. माणसाला खरं म्हणजे दोन प्रकारच्या संवेदना असतात. एक इच्छा मूलक आणि दुसरी जाणीव मूलक संवेदना. कारण मानवी जीवन हाच मुळी एक मोठा कलाविष्कार आहे.  अशी भव्य नित्य चित्र शिल्प प्रदर्शने जरुर पाहावीत. अशाप्रकारे माणसाचं मन प्रसन्न ठेवणाऱ्या चित्राकृती, शिल्पाकृती आमच्या अवतीभोवती असल्या की माणसाचं जगणं सुसह्य होतं आणि म्हणूनच बहुतेक माणूस देवदर्शनाला नित्यनेमाने जातो. मूर्ती जरी एका जागी असली तरी देवळापर्यंत जाताना निसर्गाचे बदलतं रूप त्याच्या मनाचा ठाव घेत असतं. यातूनच माणसाच्या मनावर उत्तम उपचार घडतो. ज्याला आम्ही कलर थेरपी असं म्हणतो. या रंगातूनच माणसाला रसास्वाद सुद्धा घेता येतो. यालाच ब्रह्म रसाचे सेवन असं म्हणतात. वात्सायन म्हणतात, प्रत्येक घरात एक रंग पेटी असायलाच हवी. जेवणातसुद्धा विविध रंगी पदार्थ हवेत. हिरव्या पालेभाज्या, बीटाची, टोमॅटोची लाल रंगाची कोशिंबीर, काळपट रंगाचे पंचामृत, आमसुलाची चटणी पिवळा वरण-भात, आमटी, लाल, पिवळ्या रंगाचा मसाला असलेल्या भाज्या आणि पांढरी पोळी किंवा भाकरी अशा रंगसंगतीमुळे ते जेवण जसं रुचकर लागतं तसंच आकर्षकही दिसतं. या रंगसंगतीमुळेच गुन्हेगारांना हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, शिकवून त्यांना अंतर्मुख व्हायला शिकवतात. लोक आपल्या नैराश्यातून बाहेर पडतात. सौंदर्य नष्ट करणे सोप्प पण निर्मिती करणं खूप अवघड असतं. याच्या जाणीवा जरी या लोकांच्या मनात निर्माण झाल्या तरी खूप मोठा संस्कार तिथे होतो. माणसं स्वावलंबी बनतात. त्यांना जगायचं उत्तम बळ मिळतं. उत्साह येतो. आपण उत्तम काहीतरी निर्माण करू शकतो अशी एक प्रेरणादायी खात्रीच त्याच्या मनाला पटते. कला माणसाबरोबर 24 तास राहते. माणसाची वृत्ती कलात्मक हवी. अशी कलाकार मंडळी त्या राष्ट्राचा संस्कारच वाढीला लावतात, म्हणूनच कोणतीही कला ही पैठणी सारखी जतन करायला हवी. म्हणजे समाजातील मरगळ, निराशा, धावपळ, भय, सगळं संपण्याचं काम घडतं. या कलेच्या माध्यमातून घडत असतं. आपण भान हरपून या कलेचा आस्वाद घ्यायला हवा. आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींचा विसर आपोआप पडतो आणि कलाकार आम्हाला शाश्वत आयुष्य जगायला शिकवतो. कला आम्हाला स्वावलंबी बनवते, माणूस म्हणून जगायला शिकवते. हस्तकलांना प्रोत्साहन देणारा अभ्यासक्रम आता शालेय अभ्यासक्रमात येऊ घातलाय. शिक्षणाने  नोकरी निश्चित मिळेल पण कलेमुळे मात्र कायमचीच अन्नाची किंवा उत्पन्नाची सोय होऊ शकते. म्हणूनच सुसंस्कृत राष्ट्राचा पाया पक्का करणारी कला आणि कलेचा संस्कार घडवणारी विद्यापीठे सर्वत्र पाहिजेतच.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article