कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : पोलीस विभागाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ‘एकता दौड’

02:53 PM Oct 31, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

               देशाच्या हितासाठी एकता महत्वाची : पोलीस अधीक्षक तुषार दोशी

Advertisement

सातारा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले.

Advertisement

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपपोलीस अधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दौडीमध्ये उत्साहात सहभाग घेतला.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे देशाच्या एकतेसाठी वाहिले. त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सातारा पोलीस दलाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले.

या दौडमध्ये देशभक्तीवर विविध गाणी तसेच घोषणा, विविध फलक घेऊन एकता दौड ही पोलीस मुख्यालय-पोवई नाका – पोलीस कवायत मैदान अशी काढण्यात आली, असे सांगून देशाच्या हितासाठी देशाची एकता खूप महत्वाची असल्याचेही पोलीस अधीक्षक  दोशी यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :
_satara_news#PoliceEvent#SardarPatel150#satarapolice#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaEktaDaudNationalUnityDay
Next Article