For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकता, अखंडता हीच खरी देशाची ताकद

12:04 PM Nov 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
एकता  अखंडता हीच खरी देशाची ताकद
Advertisement

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन : राजभवनमध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचा स्थापनादिन

Advertisement

पणजी : स्वातंत्र्यानंतर भारताला वैभव प्राप्त होऊन एक मजबूत राष्ट्र बनत आहे. बारकाईने पाहिल्यास जगभरात भारताची ओळख आणि आदर आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील बहुतेक सीईओ हे भारतीय आहेत. हा भारताचा एकप्रकारे सर्व राष्ट्रात आदर आणि अभिमान आहे. भारताची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यात सर्व धर्मियांचा एकसंधपणा महत्त्वाचा ठरला आहे. भारत देशाची खरी ताकत ही एकता, अखंडता हीच आहे, असे उद्गार माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी काढले. दोनापावला येथील राजभवन येथे आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू आणि अंदमान व निकोबार बेट, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनादिनाच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, ए. दुर्गा प्रसाद (अध्यक्ष - आंध्र प्रदेश संगम), मल्लिकार्जुन व्ही. बदामी (अध्यक्ष - कानडा संगम), के. आर. एस. नायर (ऑल इंडिया मल्ल्याळी असोसिएशन), हरविंदर सिंग धाम (अध्यक्ष - गुऊद्वार बेता-गोवा), एस. शिवरामन (सरचिटणीस - गोवा तमिळ संगम) आदी उपस्थित होते.

मातृभाषेला जपा

Advertisement

माजी उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ उत्सव हा प्रादेशिक संघटनांच्या प्रमुखांच्या कार्याचे दर्शन घडवतो. तरीही प्रत्येकाने स्वत:च्या मातृभाषेचा आदर करणे गरजेचे आहे. कारण मातृभाषेचा आदर केल्याने स्वत:ला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल असे सांगून त्यांनी स्वत:ची ओळख जपण्याचा सल्ला दिला. नायडू यांनी राज्यपालांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि गोव्याच्या विविध भागांना भेटी दिल्याने त्यांना गोवावासीयांचे जीवन आणि शैली जाणून घेण्यास मदत होईल, असे सांगितले.

राष्ट्रभावना महत्वाची : राज्यपाल

राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी राष्ट्र उभारणीत लोकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. लोकांमध्ये त्यांची जात, पंथ आणि धर्म विचारात न घेता एकजुटीचे बंधन राष्ट्रीय अखंडता दर्शविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. देशामध्ये एकता आणि बंधुत्वाची भावना राष्ट्र निर्माण करण्यास मदत करेल, असे त्यांनी सांगितले. देशभरात ’एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून स्थापना दिवस साजरा केला जातो. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मिर, लडाख या राज्यांनंतर स्थापना दिन साजरा करण्याचा राजभवन, गोव्याचा हा तिसरा प्रसंग आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्याचे आणि एकता आणि विविधता साजरे करण्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रत्येक प्रदेशातील वैशिष्ट्यापूर्ण गाणी आणि नृत्ये आणि विविध प्रदेशांशी संबंधित अस्सल पाककृती याशिवाय प्रत्येक प्रदेशातील विशिष्ट परंपरा प्रदर्शित करण्यात आल्या. मिहीर वर्धन, आयएएस (निवृत्त) यांनी प्रास्ताविक केले. संगमच्या इतर प्रमुखांचीही भाषणे झाली. राज्यपालांचे सचिव एम. आर. एम. राव (आयएएस), यांनी स्वागत केले. श्रीमती सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. संदेश गडकरी यांनी आभार मानले.

विविध प्रदेशातील लोक सौहार्दाचे बंध जोडतील

कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशाची माहिती देताना राज्यपाल म्हणाले, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील लोकांमध्ये परस्पर संवाद वाढवणे आणि परस्पर समज वाढवणे हा आहे. पुढे, हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समृद्ध आणि संस्कृतींचे मोठ्या उत्कटतेने प्रदर्शन करते जेणेकरून विविध प्रदेशातील सर्व लोक सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्दाचे बंध जोडू शकतील, संवाद साधू शकतील. कला, संगीत, नृत्य, पाककृती आणि पर्यटनातील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याचा हा एक प्रसंग आहे ज्यामुळे देशाची एकता आणि अखंडता मजबूत होते.

Advertisement
Tags :

.