युनायटेड गोवन्स फुटबॉल स्पर्धा आजपासून
बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्रेशन संघटना आयोजित युनायटेड गोवन्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा शुक्रवार दि. 17 पासून सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सुरू होणार आहे. दरम्यान या स्पर्धेतील चषकाचे अनावरण करण्यात आले. कॅम्प येथील युनायटेड गोवन्स रिक्रेशन क्लबच्या सभागृहात आयोजित केलेल्या चषक अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे सेक्रेटरी ए. मस्कारेन्स, स्पर्धा सचिव जॉर्ज रॉड्रीग्ज, सहसचिव जावेद चौधरी, खजिनदार विलियम मेनेंझीस, विजय रेडेकर, इम्रान बेपारी व सचिन शिरोळकर आदी मान्यवरांच्या हस्ते चषकांचे अनावरण तसेच स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. सदर स्पर्धेत 15 नामवंत शालेय संघांनी भाग घेतला आहे.
त्यामध्ये सेंट झेवियर्स अ, गुडशेफर्ड, ज्योती सेंट्रल, प्लेझंट कॉन्व्हेंट, एम. व्ही. एम. अ, अंगडी, एम. व्ही. हेरवाडकर, भरतेश, एम. व्ही. एम. बी. सेंट झेवियर्स बी, जैन हेरिटेज, ज्ञान प्रबोधन, सेंट पॉल्स व केएलएस यांचा समावेश आहे. उद्घाटनाचा सामना सेंट पॉल्स विरुद्ध ज्ञान प्रबोधन सकाळी 8 वाजता दुसरा सामना गुडशेफर्ड विरुद्ध ज्योती सेंट्रल सकाळी 9 वा., तिसरा सामना प्लझेंट कॉन्व्हेंट विरुद्ध एम. व्ही. एम. ब 10 वा., चौथा सामना भरतेश विरुद्ध एम. व्ही. एम. ब 11 वा., पाचवा सामना अंगडी विरुद्ध एम. व्ही. हेरवाडकर दुपारी 12 वा. व सहावा सामना सेंट झेवियर्स ब विरुद्ध जैन हेरिटेज यांच्यात दुपारी 1 वाजता होणार आहे.