जपानमध्ये अनोख्या टाइल्सची निर्मिती
लोक चालल्यावर होते वीजनिर्मिती
जपान हा अत्यंत छोटा देश असला तरीही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तो अत्यंत अग्रेसर आहे. जपानने केलेल्या एका कामगिरीमुळे पूर्ण जग थक्क झाले आहे. जपानने आता लोकांच्या चालण्याच्या क्रियेतून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तेथील सार्वजनिक स्थळी स्मार्ट टाइल्स बसविण्यात आल्या असून त्यावर लोक चालल्यावर वीज निर्माण होत आहे.
जपानमध्ये केवळ लोक चालल्याने आता वीजनिर्मिती होत आहे. राजधानी टोकियोमध्ये सरकारने हे तंत्रज्ञान अवलंबिले आहे. याकरता गर्दीयुक्त भागांमध्ये स्मार्ट टाइल्स बसविण्यात आल्या आहेत. यावरून लोक चालल्याने वीज निर्मिती होत आहे. पाइजो इलेक्ट्रिसिटी तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे.
या टाइल्सवर लोकांचे पाय पडताच कायनेटिक एनर्जी प्राप्त करत त्याला इलेक्ट्रिक एनर्जीत रुपांतरित केले जाते. लोकांच्या एका पावलामुळे 10 बल्ब 20 सेकंदांपर्यंत चालू ठेवता येतात. जपानसोबत या तंत्रज्ञानाचा वापर युरोपचे अनेक देश देखील करत आहेत. या देशांमध्ये फुटबॉलचे मैदान आणि गर्दीयुक्त ठिकाणी स्मार्ट टाइल्स बसविण्यात आल्या आहेत.