खोल समुद्रात अनोखे मातृत्व
खोल समुद्रात दडलेले जग नेहमीच वैज्ञानिकांना आकर्षित करत राहिले आहे. जेथे सूर्याची किरणेही पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी जीवनाचे असे चमत्कार दडलेले आहेत, जे मानवी कल्पनेच्या पलिकडील आहेत. सागरीसृष्टीत एक ऑक्टोपस मादी स्वत:च्या अंड्यांच्या रक्षणासाठी अनेक महिन्यांपर्यंत काही न खाता बसून राहते. यादरम्यान नर ऑक्टोपस गायब असतो. त्याला अंडी किंवा मादी ऑक्टोपसशी काहीच देणेघेणे नसते. ही काही साधारण कहाणी नसून निसर्गातील मातृत्व बलिदानाचे उदाहरण आहे. ग्रॅनेलेडोन बोरीओपेसिफिका नावाच्या या खोल समुद्रातील ऑक्टोपस प्रजातीने विक्रम मोडला आहे. मादी ऑक्टोफास अनेक महिन्यांपर्यंत स्वत:च्या अंड्यांची देखभाल करते. यादरम्यान ती काहीच खात नाही. तिचे लक्ष्य केवळ स्वत:च्या पिल्लांना सुरक्षित ठेवणे असते.
कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून हजारो मीटर खोलवर मोन्टेरे बे एक्वेरियम रिसर्च इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी हा शोध लावला. रिमोटली ऑपरेटेड व्हीकल (आरओव्ही) ‘डॉक रिकेट्स’ने मॉन्टेरे कॅनियनच्या एका भागात मादी ऑक्टोपसला पाहिले. ती स्वत:च्या 8 भुजांनी वेढलेली होती, त्याच्या आत छोटी छोटी अंडी होती. आम्ही दर दोन महिन्यांनी अनेकदा तेथे परत जाऊन पाहिले असता मादी ऑक्टोपस तेथेच होती. ती अजिबात न हलता, न खाता तेथेच राहिली. अंड्यांमधून जीव बाहेर येईपर्यंत ती तेथेच होती, असे संशोधक ब्रूस रॉबिसन यांनी सांगितले.
महिन्यानंतर संशोधकांनी तेथे छोटे बेबी ऑक्टोपस दिसून आले. सुमारे 4 सेंटीमीटर लांब आणि पूर्णपणे विकसित, परंतु त्यांना मोठे करण्यासाठी त्यांच्या आईने मोठी किंमत मोजली. ती भूकेने तडफडून मृत्यूमुखी पडली होती. तिच्या शरीराचा रंग फिका पडला होता. ही सर्वात मोठी गर्भावस्था आहे. खोल समुद्रात पाण्याचे तापमान केवळ 2.8 ते 3.4 अंश असते. थंडी विकासाला मंद करते. उथळ समुद्रातील ऑक्टोपस 6 महिन्यांमध्ये अंडी फोडते, परंतु येथे जीव मजबूत निर्माण होण्यासाठी वर्षे लागतात असे ब्रॅड सीबेल यांनी सांगितले आहे.