पाकिस्तानात अनोखा विवाह
6 सख्या भावांचा 6 सख्या बहिणींशी विवाह
पाकिस्तानात सध्या एका विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचे कारण या सोहळ्यात 6 सख्ख्या भावांनी 6 सख्ख्या बहिणींशी विवाह केला आहे. हे अनोखे आयोजन 100 हून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडले आहे. या विवाहात हुंडा घेतला गेला नाही तसेच कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च करण्यात आलेला नाही. खास बाब म्हणजे हा सोहळा आयोजित करण्यासाठी सर्व भावांना मोठी प्रतीक्षा करावी लागली आहे, कराण सर्वात छोटा भाऊ प्रौढ होईपर्यंत त्यांना विवाह करता येत नव्हता.
मोठ्या भावाने सर्व 6 भाऊ एकाच दिवशी विवाह करतील असा निश्चय केला होता. सध्या लोक विवाहांसाठी कर्ज घेतात किंवा स्वत:ची जमीन विकतात. परुंत आम्ही आर्थिक भार टाकल्याशिवार विवाह स्मरणीय आणि आनंदी करता येतो हे आम्हाला दाखवून द्यायचे होते असे एकाने म्हटले आहे.
या भावांनी अशा परिवाराची निवड केली ज्यात 6 सख्ख्या बहिणी होत्या. त्यांच्या परिवाराशी बोलणी करून विवाहासाठी सहमती मिळविण्यात आली. यानंतर विवाहाचे विधी करण्यात आले आणि हे आयोजन अत्यंत साधेपणाने आणि प्रेमाने पार पाडण्यात आले.
केवळ 30 हजार रुपयांत विवाह
या सामूहिक विवाहसोहळ्यात एकूण खर्च केवळ 1 लाख पाकिस्तानी रुपये आला. हे प्रमाण भारतीय चलनात केवळ 30 हजार रुपये आहे. या कमीत खर्चात झालेला हा विवाहसोहळा महागड्या विवाहांच्या परंपरांना आव्हान देणारा आहे. विवाहाचा व्हिडिओा पाकिस्तानच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या साधेपणाने पार पडलेल्या विवाहाचे कौतुक करत असून याला नवी मानसिकता आणि प्रेरणेचे प्रतीक मानत आहेत.