अनोखी नोकरी, वर्षाकाठी 2 कोटीची कमाई
एखाद्याची नोकरी गेल्यास त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु 40 वर्षीय सँड्रा जेम्सने संकटाला संधीत बदलले आहे. 2011 मध्ये तिला फायनान्शियल सर्व्हिस मॅनेजर पदावरून हटविण्यात आले होते, तेव्हा तिला सर्वकाही संपल्याचे वाटू लागले होते. कारण त्यावेळी सँड्राला 50 लाख रुपयांचे पॅकेज मिळत होते. परंतु काही महिन्यांमध्येच तिने स्वत:ला सावरले. आता ती दरवर्षी 2 कोटी रुपये कमावत आहे. मी नोकरी करून 13 वर्षी वाया घालविल्याचे ती सांगते.
इंग्लंडची रहिवासी असलेली सँड्रा सध्या 53 वर्षांची आहे, ती वयाच्या 22 व्या वर्षापासून नोकरी करत होती आणि अत्यंत आनंदा होती. याचदरम्यान 2011 मध्ये मंदीमुळे तिला नोकरी गमवावी लागली होती. परंतु काही दिवसांतच या संकटाला संधीत रुपांतरित करण्याचा मी निर्णय घेतला होता असे सँड्रा सांगते.
मला प्राण्यांबद्दल मोठी आत्मियता होती. याच आत्मियतेला मी व्यवसायात बदलले आहे. काही दिवस विचार केल्यावर मी ‘कॅट बटलर’ झाले. कॅट बटलरचे काम पाळीव मांजरांना पाळणे असते. प्रारंभी काही काम मिळाले, परंतु काही महिन्यांमध्ये मोठी मागणी येऊ लागली. यानंतर 2015 मध्ये मी एक सेंटर सुरू केले. यादरम्यान या कामात मी एकटी नसल्याचे कळले. अनेक लोक अशाप्रकारचे काम करत आहेत असे तिने सांगितले आहे.
प्रोफेशनल कॅट बटलरची कमाई अत्यंत चांगली आहे. अनेक लोक कुटुंबासमवेत सुटीवर जात असतात. तेव्हा ते स्वत:च्या मांजरांना सोबत नेऊ शकत नाहीत. मग हे लोक या मांजरांना आमच्याकडे सोडून जातात. प्रारंभी या व्यवसायाकरता 3 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. अनेक प्रकारची जोखीम देखील होती. परंतु ग्राहकांची संख्या वाढू लागल्यावर कमाईही वाढली. सध्या माझे जवळपास 6 लाख फॉलोअर्स आहेत. आता मी अनेक फ्रेंचाईजी सुरू केल्या आहेत. पशुचिकित्सक नेटवर्कही तयार केले आहे. दरवर्षी आता मी 2 कोटी रुपये कमावत असून अनेक जणांना कामावर ठेवले असल्याचे तिने सांगितले आहे.