Sangli News : सावळज स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार ; गावकऱ्यांत भीतीचे वातावरण
सावळज स्मशानभूमीत अघोरी कृत्य
सावळज : सावळज स्मशानभूमीत अंधश्रद्धा, भानामती व जादूटोण्यासारखा संशयित अघोरी प्रकार उघड झाला आहे. स्मशानभूमीत कुंकू, टाचण्या रोवलेले लिंबू व भानामतीचे इतर साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात भीती व चर्चाना उधाण आले आहे.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात असे प्रकार घडत असल्याने सुजाण नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गुरूवारी सकाळी रक्षाविसर्जन विधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांच्या नजरेस भाणामती व जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य व अघोरी कृत्य केल्याचे निदर्शनास पडले. गावाजवळील स्मशानभूमीत अज्ञातव्यक्तीने कागदावर मोठ्या प्रमाणात कुंकू तर सोबत टाचण्या खोवलेले लिंबू ठेवून अघोरी कृत्य केल्याचे दिसुन आले.
त्यामुळे हा जादूटोण्याचा भाग असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकार ग्रामस्थांनी हा ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिला. याप्रकरणी योग्य चौकशी करावी, अशी मागणी केली.