महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनोखा घटस्फोट, पतीने मागितली किडनी

06:17 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खर्च केलेला पैसाही परत करण्याची मागणी

Advertisement

घटस्फोटाची अनेक प्रकरणे तुमच्या ऐकीवात असतील, परंतु एक प्रकरण काहीसे वेगळे आहे. सर्वसाधारणपणे सेटलमेंट म्हणून पती किंवा पत्नी पैसे मागत असते. परंतु एका व्यक्तीने किडनीच मागितली आहे. डॉ. रिचर्ड बतिस्ताने पत्नीकडून स्वत:ची किडनी परत मागितली आहे, रिचर्ड यांनी स्वत:च्या पत्नीला किडनी दान केली होती. पत्नी किडनी परत करू शकत नसल्यास 1.2 दशलक्ष पाउंड तिने द्यावेत असे रिचर्ड यांनी म्हटले आहे. हे प्रकरण अमेरिकेत घडले आहे.

Advertisement

रिचर्ड यांनी डॉनेल यांच्याशी 1990 मध्ये विवाह केला होता. दोघांनीही तीन मुले आहेत, परंतु पत्नी आजारी पडू लागल्यावर वैवाहिक नात्यात अडचणी उभ्या राहू लागल्या. 2001 मध्ये बतिस्टा यांनी स्वत:च्या पत्नीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला, डॉनेल यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. माझी पहिली प्राथमिकता पत्नीचे जीवन वाचविण्याची तर दुसरी प्राथमिकता विवाह टिकविण्याची होती. परंतु याच्या 4 वर्षांनीच पत्नी डॉनेलने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे बतिस्टा यांनी सांगितले.

घडलेल्या प्रकारामुळे बतिस्टा खूपच निराश झाले. त्यांनी पत्नीवर अफेयर असल्याचा आरोप केला. तसेच किडनी परत करण्याची किंवा त्या बदल्यात पैसे देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशा स्थितीत किडनी परत करणे शक्य नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी स्पष्ट पेले. किडनी परत करण्यासाठी डॉनेल यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया कराव लागेल, यामुळे त्यांच्या जीवाला धोका देखील आहे. तसेच आता ही किडनी डॉनेल यांची झाली आहे, कारण ती त्यांच्या शरीरात असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

बतिस्टा यांची मागणी नासाउ काउंटी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याप्रकरणी न्यायालयाने 10 पानी निर्णय दिला आहे. पक्षकाराकडून भरपाई आणि किडनी मागण्याचा प्रकार कायद्यानुसार निर्धारित तोडग्याच्या विपरित आहे, तसेच संभाव्य स्वरुपात पक्षकाराला गुन्हेगारी खटल्यात अडकवू शकते असे मॅट्रिमोनियल रेफरी जेफरी ग्रोब यांनी म्हटले आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article