महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतात खोदकामावेळी लागला अनोखा शोध

06:45 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलंडमध्ये 80 वर्षे जुन्या रहस्याची उकल

Advertisement

जमिनीत खोदकाम करताना अनेकदा खजिना मिळत असतो. पोलंडच्या एका छोट्या शहरानजीकच्या शेतात खोदकाम सुरू असताना मिळालेल्या गोष्टी पाहून पुरातत्वतज्ञही दंग झाले आहेत. तेथे 80 वर्षे जुने रहस्य सर्वांसमोर आले आहे. इतक्या वर्षांपर्यंत शेतात अशाप्रकारची गोष्ट लपून राहिली होती याचेच आश्चर्य आता स्थानिकांना वाटतेय.

Advertisement

पोलंडच्या चोजनिस शहरात खोदकामादरम्यान पुरातत्वतज्ञांना एक सामूहिक दफनभूमी सापडली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींनी येथे 100 हून अधिक लोकांना एकाचवेळी गोळ्या घालून ठार केले होते. त्यांचे मृतदेह येथेच पुरण्यात आले होते. याचमुळे पुरातत्वतज्ञांनी याला डेथ व्हॅली ठरविले आहे. मारले गेलेले सर्व लोक एका रुग्णालयातील मनोरुग्ण होते, त्यांना ऑक्टोबर 1939 च्या अखेरीस जर्मन अधिकाऱ्यांनी ठार केले होते.

मनोरुग्णांची दफनभूमी

ही मानसिकदृष्ट्या आजारी लोकांची दफनभूमी आहे. बहुधा पहिल्यांदाच इतक्या संख्येतील मनोरुग्णांची दफनभूमी सापडली आहे. यातील अनेक मृतदेहांवर कपडे देखील नव्हते. तेथे केवळ एक बटन मिळाले असून या लोकांचे कुठलेही वैयक्तिक सामान नव्हते. परंतु मृतदेहांनजीक गोळ्यांचा ढिग मिळाला असल्याचे पुरातत्वतज्ञ दाविद कोबियाल्का यांनी सांगितले.

आम्ही आतापर्यंत दफनभूमीचा निम्मा भाग खोदू शकलो आहोत. ऐतिहासिक आकडेवारीनुसार काही दिवसांमध्ये 218 जणांना ठार करत मृतदेह सामूहिक  दफनभूमीत लपविण्यात आले होते. 1939 मध्ये पोमेरेनिया येथे अनेक ठिकाणी मनोरुग्णांची हत्या करण्यात आली होती. परंतु 1944 मध्ये यातील जवळपास सर्व ठिकाणांना नष्ट करण्यात आले हेते. जर्मन प्रशासनाने या दफनभूमी खोदल्यावर अन्या गोष्टींसोबत मनोरुग्णांचे मृतदेहही जाळले हेते. सध्या ही एकमात्र सामूहिक दफनभूमी शिल्लक असल्याचे पुरातत्वतज्ञांनी सांगितले.

मनोरुग्णांचा करायचा द्वेष

जर्मन हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलर मनोरुग्णांचा द्वेष करायचा. याचमुळे ऑक्टोबर 1939 मध्ये त्याने ‘अॅक्शन टी-4’ नावाचे अभियान सुरू केले होते. याच्या अंतर्गत मनोरुग्णांची सामूहिक हत्या करण्यात आली. याला अनैच्छिक इच्छामृत्यू देखील म्हटले जाते. सप्टेंबर 1939 मध्ये हिटलरच्या सैन्याने पोलंडवर कब्जा केला, तेव्हा तेथेही सामूहिक हत्या करण्यात आल्या. काही अवशेषांवर गोळ्यांच्या खुणा दिसून आल्या आहेत असे पोलंडचे तपासकर्ते जनरल आंद्रेज पोजोरस्की यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article