उंटाच्या आकाराचा अनोखा मॉल
जगात सध्या इमारतींमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग होत आहेत. आता उंच इमारती केवळ आयताकृती असण्याचे दिवस मागे पडले आहेत. इमारतींना आकर्षक दाखविण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. आता एक अशीच अनोखी इमारत व्हायरल व्हिडिओत दिसून आली आहे. सौदी अरेबियात उंटाच्या आकाराचा मॉल तयार केला जाणार आहे. ही इमारत अद्याप पूर्ण झालेली नाही, परंतु याचा व्हिडिओ चर्चेत आहे. जगात मॉलच्या इमारती एकाहून एक सरस आहेत.
याच्या निर्मितीचा सर्वात मोठा उद्देश अधिकाधिक लोक या इमारतीत यावेत असा असतो. याकरता ते सजावटीपासून अनेक प्रकारच्या ऑफर्सचाही वापर करतात. परंतु या इमारतीचे उंटासारखे डिझाइनच लोकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. वाळवंटाचे जहाज उंट हा सौदी अरेबियासारख्या मध्यपूर्वेतील देशाचे प्रतीक म्हटले जाऊ शकते. उंट पूर्व मध्यपूर्वेच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. परंतु याच्या आकाराची इमारत कशी असेल याची कल्पना आता लोक करत आहेत. या इमारतीला बसलेल्या उंटाचा आकार दिला जात आहे. मॉलसारखी मोठी इमारत रात्री कृत्रिम प्रकाशादरम्यान उठून दिसते. असेच काहीसे या मॉलसोबतही असेल. व्हिडिओत रात्रीच्या दृश्यात ही उंटासारखी इमारत अनोखी दिसून येत आहे. याच्या व्हिडिओला आतापर्यंत 63 लाख ह्यूज मिळाले आहेत.