For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय मल्लांना केंद्रिय क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा कंदील

06:05 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय मल्लांना केंद्रिय क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा कंदील
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

अल्बेनियातील तिराना येथे 28 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वरिष्ठांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी होण्याकरिता भारतीय मल्लांना केंद्रिय क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या कार्यकारिणीमध्ये वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय मल्लांना शेवटच्या क्षणापर्यंत केंद्रिय क्रीडा मंत्रालयाकडून कोणताही आदेश आला नव्हता. दरम्यान सदर स्पर्धा दोन दिवसांवर येवून ठेपली असताना केंद्रिय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी ही घोषणा केली.

Advertisement

अल्बेनियात होणाऱ्या या विश्वचषक कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने भारतीय संघ पाठविण्याच्या प्रक्रियेतून माघार घेतल्याचे गेल्या गुरुवारी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय मल्ल सहभागी होणार किंवा नाही याबद्दल सांशकता व्यक्त केली जात होती. आता या स्पर्धेत भारतीय मल्ल सहभागी होवून चांगली कामगिरी करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.