महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केंद्रीय मंत्री सोमण्णा आज बेळगाव दौऱ्यावर

11:33 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा सोमवार दि. 16 रोजी बेळगावसह कोल्हापूर भेटीवर येत आहेत. कोल्हापूर-पुणे व हुबळी-पुणे या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते येणार आहेत. बेळगाव रेल्वेस्थानकावर होणाऱ्या वंदे भारतच्या उद्घाटनाला त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मंत्री व्ही. सोमण्णा सकाळी दिल्लीहून बेळगावला विमानाने येणार आहेत. बेळगावमध्ये काही काळ थांबल्यानंतर ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील. दुपारी 1 वा. ते कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयाला भेट देणार आहेत. दुपारी 2.30 वा. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल रेल्वेस्थानकाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. दुपारी 4 वा. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन समारंभात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरहून बेळगावला दाखल होणार आहेत. बेळगाव येथे होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन समारंभात रात्री 8 वा. सहभागी होतील.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article