केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची सांबरा विमानतळावर घेतली भेट
11:24 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : नागरी उड्डाण व सहकार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव विमानतळावर भेट घेऊन बेळगावहून पुणे, नाशिक व बंद केलेल्या विमानसेवा पुन्हा सुरू कराव्यात, अशी विनंती केली. तसेच पुढच्या वर्षीच्या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. खासदार मोहोळ यांनी दुर्गामाता दौडीत नक्की येईल, असे सांगितले. याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, मोहन जोई, राजू पोटे, दिलीप चव्हाण, शिवाजी मंडोळकर, शहर प्रमुख अनंत चौगुले, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील आणि राजू नाईक उपस्थित होते.
Advertisement
Advertisement