For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

12:24 PM Apr 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ भाजप नेते दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,बाळू कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करुन करण्यात आला. आचरा विभागातून राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आचरा सरपंच जेरान फर्नांडीस, निलीमा सावंत, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, संतोष कोदे राजन गांवकर, डॉक्टर प्रमोद कोळंबकर, राजन पांगे, संतोष गांवकर, जयप्रकाश परुळेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, आचरा ग्रा प सदस्य मुझफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, बबलू गावकर, मंदार सांबारी, अभिजित सावंत, अभय भोसले, सचिन हडकर, नाथ मालंडकर, माजी उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, वामन आचरेकर, लवू मालंडकर,उदय घाडी, लवू मालंडकर, रुपेश हडकर, उदय पुजारे, सारंग, श्रीपाद सावंत यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आचरा देवूळवाडी येथील रवींद्र गुरव व मंदार सांबारी यांच्या घरी भेट देवून प्रचाराला सुरवात केली गेली.

Advertisement

Advertisement
Tags :

.