कामचुकार वीज अधिकाऱ्यांवर कारवाई करा
शिक्षणमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ; सावंतवाडीत वीज प्रश्नांसंदर्भात बैठक
सावंतवाडी | प्रतिनिधी
जे काम चुकार वीज अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. जे वीज अधिकारी असे वागतील त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेत झालेल्या बैठकीत दिल्या. एकाही गावात वीज खंडित राहता कामा नये. तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करा. दोडामार्ग भागातील वीज प्रश्नांसंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री व वीज विभागाचे चेअरमन यांच्या समवेत बैठक घेऊन तेथील प्रश्न कायमचा मिटवला जाईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. आजच्या सावंतवाडी येथे झालेल्या वीज समस्या संदर्भाच्या बैठकीत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी वीज अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्हाला कुठल्या गावात वीज पुरवठा खंडित आहे आम्ही दाखवायचे का.,आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश गावात वीज पुरवठा खंडित आहे तो दुरुस्त करा. कामासाठी लागण्याच्या मॅनपॉवरचा प्रश्न सांगू नका असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळीजिल्हाधिकारी किशोर तावडे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलकर्णी ,प्रांताधिकारी ,उपवनसंरक्षक आदी उपस्थित होते.