केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आज बेळगावमध्ये
12:43 PM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा मंगळवार दि. 3 रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. बेळगावमध्ये केएलई अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चच्या दीक्षांत सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहे. सकाळी 6.30 वा. बेंगळूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते बेळगावच्या दिशेने रवाना होतील. सकाळी 8.05 वाजता ते बेळगाव विमानतळावर दाखल होणार आहेत. सकाळी 9 वा. ते केएलईमधील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. दुपारपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून त्यानंतर ते वाहनाने हुबळीच्या दिशेने रवाना होणार आहेत.
Advertisement
Advertisement