युनियन जिमखानाकडे संजीवीनी चषक
10:39 AM Oct 14, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
कर्णधार सलमान धारवाडकरने 8 चौकारांसह नाबाद 47 धावांची खेळी साकारली. सर्वम मुरारीने 3 चौकारांसह 16, समर्थ कोळेकर 2 चौकारांसह 14 तर स्मितराज पोरवालने 12 धावा केल्या. प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमीतर्फे हर्षित लेंगडने 3, सहन मंडलने 2 तर सफान नदाफने 1 गडी बाद केला.बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे आनंद चव्हाण, पद्मा हौशीकर, साईश धोंड, मुर्गेश अलबाळ व प्रमोद पालेकर यांच्या हस्ते सर्व विजेत्या उपfिवजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धामध्ये किशोरवयीन खेळाडूनी आतुलनीय कामगिरी करत वैयक्तिक विजेतेपद पटकाविले यामध्ये आदर्श नागरेकरला ‘सामनावीर’, प्रथम अलबाळ उत्कृष्ट फलंदाज, सपान नदाफ उत्कृष्ट गोलंदाज तर अनुप कुंडेकर हा इम्पॅक्ट खेळाडू ठरला. युनियन जिमखानाची संचिता नाईक ही ‘मालिकावीर’ ठरली.
Advertisement
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित संजीवीनी फौंडेशन चषक 11 वर्षां खालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखाना संघाने यजमान प्रमोद पालेकर क्रिकेट अपॅडमी संघाचा 4 गड्यांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. व्हॅक्सिन डेपो मैदानावर झालेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 बाद 138 धावा केल्या. त्यात अनुप कुंडेकरने 7 चौकारांसह 65 तर प्रथम अलबाळने 5 चौकारांसह 43 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे आठ वषीय आदर्श नावगेकरने किफायतशीर गोलंदाजी करताना 13 धावात 2 गडी तर समर्थ कोळेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 20.3 षटकात 6 बाद 140 धावा जमवित हा अंतिम सामना 4 गड्यांनी जिंकला.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article