युनियन जिमखाना, साई स्पोर्ट्स संघ विजयी
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघानी विजय मिळवले. साईराज वॉरियर्स, फोदार सीसीआय, रोहन टेडर्स बीएससी व भाटे वारीयर्स संघानी कॉलिफायर्स व इलीमनेटर फेरीत प्रवेश केला आहे. युनियन जिमखाना मैदानावर पहिला सामन्यात के आर शेट्टी किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या. त्यात कर्णधार स्वप्नील येळवेने 4 चौकार एक षटकारांसह 49, हबीब ताडपत्रीने 4 चौकारांसह 23 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना तर्फे अद्वेत साठे व अक्षय जगताप यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर पार्थ पाटील आनंद कुन्नूर व केतज कोल्हापुरे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने 16.4 षटकात 6 गडी बाद 138 धावा करून हा सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात केतज कोल्हापुरेने 6 चौकार 2 षटकारांसह 46, विनोद देवडीगाने 17 तर अक्षय जगतापने 2 षटकार एक चौकारांसह 21 धावा केल्या. के. आर. शेट्टी किंग्ज तर्फे किरण तारळेकर व स्वप्निल येळवे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.