महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युनियन जिमखाना, निना स्पोर्ट्स विजयी

10:10 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केएससीए 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 16 वर्षाखालील आंतरक्लब क्रेकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून निना स्पोर्ट्सने लक्ष क्रिकेट अकादमीचा 6 गड्यांनी तर युनियन जिमखाना ब ने एसडीएम क्रिकेट अकादमी धारवाड ब चा 53 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. प्रज्वल जाधव, साईराज पोरवाल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात निना स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 18.4 षटकात 4 गडी बाद 72 धावा केल्या.

Advertisement

समर्थ चौगुलेने 3 चौकारासह 26, प्रज्वल जाधवने 12 धावा केल्या. लक्ष क्रिकेट अकादमीतर्फे सुमीत कांबळे 13 धावात 3 तर प्रथम कामतने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लक्ष क्रिकेट अकादमीचा डाव 21. 3 षटकात सर्व गडी बाद 68 धावात आटोपला. त्यात अर्थव मानेने 16, श्रीनिवास कल्लण्णावरने 11 धावा केल्या. निनातर्फे प्रज्वल जाधवने 27 धावात 5, अब्ररार काजीने 19 धावात 3, तर अमर व हर्ष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.केएससीए ऑटोनगर येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 45 षटकात 8 गडी बाद 197 धावा केल्या.

त्यात साईराज पोरवालने 3 चौकारासह 54, आर्यन मुरोडकरने व नवीन बेकवाडकर यानी 1 षटकार 2 चौकारासह प्रत्येकी 29, महम्मद हमजाने 16, तर औदुंबरने 11 धावा केल्या. एसडीएम बी धारवाडतर्फे साई समर्थ सारापुरने 33 धावात 3 तर साई समर्थ विदापुडी प्रथम व रिहान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल एसडीएम क्रिकेट अकादमी धारवाडचा डाव 41.3 षटकात 144 धावात आटोपला. त्यात प्रितम के. ने 4 चौकारासह 63, साकिब सावनुरने 16, प्रज्वल एस. ने. 13, अनास बडीगेरीने 11 धावा केल्या. जिमखानातर्फे अतिथ बोगन, निश्चिल हिरेमठ, विख्यात अधिकारी यांनी प्रत्येकी 2 तर नमन दड्डीकर, महम्मद हमजा, औंदुंबर एच. यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article