कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युनियन जिमखाना, मलतवाडकर विजयी

10:26 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बालाजी चषक क्रिकेट स्पर्धा 

Advertisement

बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित बालाजी चषक 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मलतवाडकर क्रिकेट अकादमीने साई स्पोर्ट्स अकादमीचा 2 गड्यांनी तर युनियन जिमखानाने एसकेई अकादमीचा 78 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. आयुष खाडे व मोहम्मद हमजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साई स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 93 धावा केल्या. त्यात आयुष खाडेने 6 चौकारासह 35, अवयुक्तने 11 धावा केल्या. मलतवाडकर अकादमीतर्फे अर्णव पाटीलने 21 धावांत 2 तर आरुश व शिवांश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना मलतवाडकर अकादमीने 20 षटकात 8 गडी बाद 94 धावा करुन सामना 2 गड्यांनी जिंकला. त्यात अंकुश संपतने 16 तर अर्णव पाटीलने 10 धावा केल्या. साईतर्फे आयुष खाडेने 16 धावांत 5, अवयुक्तने 9 धावांत 2 तर अर्णवने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 3 गडी बाद 216 धावा केल्या. त्यात मोहम्मद हमजाने 17 चौकारांसह 77 चेंडूत 108 धावा करुन दुसरे शतक झळकविले. त्याला कृष्णा पाटीलने 39 तर अंशने 17 धावा करुन सुरेख साथ दिली. एसकेईतर्फे निशांत नायकने 27 धावांत 2 तर हरिष प्रसादने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेई अकादमीने 25 षटकात 7 गडी बाद 138 धावा केल्या. मिरासाब बी.ने 7 चौकारासह 41, दक्ष शेरेगारने 20, अर्णवने 17 तर समर्थने 14 धावा केल्या. जिमखानातर्फे अंश व सलमान यांनी प्रत्येकी 2 तर गौरव व निश्चय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article