For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनियन जिमखाना,बीडीके हुबळी संघ विजयी

10:14 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
युनियन जिमखाना बीडीके हुबळी संघ विजयी
Advertisement

केएससीए 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 19 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून युनियन जिमखाना संघाने सिग्नेचर स्पोर्ट्स क्लबचा 4 गड्यांनी तर बीडीके ए ने एसडीएम धारवाडचा 94 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. अष्टपैलू खेळाडू अर्जान दुकानदार, अब्दुल समी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हुबळी येथील केएससीए मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बीडीके अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 2 गडी बाद 265 धावा केल्या. त्यात अब्दुल समीने 19 चौकारांसह 112 धावा करून दमदार शतक झळकविले तर त्याला साथ देत आकाश कुलकर्णीने 1 षटकार 13 चौकारांसह नाबाद 102 धावा करून शतक झळकविले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 184 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्याला मुस्तसीम अहमद नाबाद 16 धावा केला. एसडीएम धारवाडतर्फे मुशाहिदने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएमसी धारवाडचा डाव 37.1 षटकात 192 धावात आटोपला. त्यात साईनाथ माळीने 5 षटकार 8 चौकारासह 94, शहाबाजने 26, प्रभूने 15 तर मुशाहिदने 14 धावा केल्या. बीडीकेतर्फे मुस्तकीमने 38 धावात 3 तर हर्ष शानले, रिहान मकानदार, अथर्व नुली यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात सिग्नेचर स्पोर्टस संघाने 36.2 षटकात सर्वगडी बाद 119 धावा केल्या. त्यात दर्शन सुनगारने 24, चैतन्य हिरेमठने 21, पुष्पक मरूचेने 13 धावा केल्या. जिमखानातर्फे स्वरूप साळुंखेने 19 धावात 4, अर्जान दुकानदारने 28 धावात 3, प्रतीक कराडेने 40 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 15.1 षटकात 6 गडी बाद 120 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात प्रतीक कराडेने 2 षटकार, 3 चौकारासह 30, अथर्व बेनके 3 चौकारासह 20, उत्कर्ष शिंदेने 4 चौकारासह 19 तर स्वरूप साळुंखेने नाबाद 17 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे समर्थ कोकणेने 47 धावात 4, आदित्य पात्राने 28 धावात 2 गडी बाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.