महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेलंगणात समान नागरी संहिता लागू करणार

05:21 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपचे आश्वासन : मोफत लॅपटॉप, वर्षात 4 सिलिंडर मोफत

Advertisement

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जारी करण्यात आले आहे. राज्यात सत्ता मिळाल्यास समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘मोदीची गॅरंटी’ आहे. राज्यात सत्तेवर आल्यास 6 महिन्यांच्या आत समान नागरी संहिता लागू करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शाह यांनी केली आहे.

Advertisement

घटनाबाह्या धर्मआधारित आरक्षण समाप्त करण्यात येईल आणि ओबीसी, एससी आणि एसटीसाठी आरक्षण वाढविण्यात येणार आहे. तसेच बीआरएस सरकारकडून करण्यात आलेल्या आर्थिक अनियमिततेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखील समिती स्थापन करून  चौकशी करण्यात येणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी केला जाणार आहे. तसेच उज्ज्वला लाभार्थींना दरवर्षी 4 सिलिंडर मोफत देण्यात येतील. तर वर्तमान ‘धरणी’ला ‘मी भूमी’मध्ये बदलण्यात येईल असे आश्वासन भाजपने दिले आहे. धरणी हे बीआरएस सरकारकडून आणले गेलेले एकीकृत भूमी प्रशासन पोर्टल आहे.

शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे. तर मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर दोन लाख रुपयांची ठेव ठेवण्यात येईल. या ठेवीची रक्कम वयाच्या 21 वर्षांनंतर संबंधित मुलीला मिळणार आहे.

राम मंदिराचे मोफत दर्शन घडवून आणू

भाजप राज्यात सत्तेवर आल्यास तेलंगणातील सर्व रहिवाशांना अयोध्येतील राम मंदिरात मोफत दर्शन घडवून आणले जाणार आहे. काँग्रेसने मागील 70 वर्षांमध्ये राम मंदिराच्या उभारणीत अडथळेच निर्माण केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेत भूमिपूजन केले होते. या मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article