संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जावं लागणं हे दुर्दैवः संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर
"जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे यांच्यामध्ये इतकं काय आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाही आहे. धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का? संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी होती का? महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलीस ते व्हिडिओ जनतेसमोर का आणत नाहीत?संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे, त्यामध्ये वाल्मीक कराड सोबत संबंध असलेले अधिकारी आहेत. बीड मधील लहान मुलांपासून सर्वांना माहिती आहे या प्रकरणातील आरोपी कोण आहेत. मग सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे.महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवण्याचे काम या घटनेमुळे होत आहे. या प्रकरणातील मारेकऱ्यांना शिक्षा देऊन दहशत मोडीत काढण्याचे पहिलं पाऊल उचलावं. याप्रकरणी अनेकांना धमकी आली आहे मात्र मला धमकी देण्याचे धाडस कोण करत नाही. जर कोणी धमकी देण्याचे धाडस केलं तर पुढे बघू. शरद पवार यांनी या प्रकरणांमध्ये उचललेले पाऊल योग्य आहे", असे सवाल विचारत संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांनी प्रतिक्रिया दिली.
याप्रसंगी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी मतदारांना मालक झाला आहात का? असं म्हणणं योग्य नाही. मतदारांसमोर आपण हात जोडून जात असतो त्यांना सन्मान दिला पाहिजे."