For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराला 100 ई - बसची प्रतीक्षा

05:55 PM Jan 09, 2025 IST | Radhika Patil
शहराला 100 ई   बसची प्रतीक्षा
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

केएमटीच्या जुन्या बसेसमध्ये वारंवार बिघाड होत आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, बसेसची संख्या अपुरी पडत आहे. बसची 10 टन वजन पेलण्याची क्षमता असताना अपुऱ्या बसेसमुळे जादा प्रवाशी भरावे लागत असल्याने 12 ते 14 टनापर्यंत वजन पेलावे लागत आहे. यामुळे जादा लोड भरला जात असल्याने दुरुस्तीचे प्रमाण वाढत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या केएमटीच्या 76 बसेस धावत आहेत. यामध्ये नवीन 9 एसी बसचा समावेश आहे. उर्वरित 67 बसेस 10 वर्षापूर्वीच्या आहेत. त्यातही नियमापेक्षा जादा लोड भरल्याने बसेसचे आयुष्यमान कमी होत आहे. प्रवाशांची संख्या अधिक व बसची संख्या कमी अशी स्थिती झाल्यामुळे नवीन ई-बस तत्काळ दाखल होण्याची गरज निर्माण झाली आहे. बुधवारी अचानक शॉर्टसर्किट होऊन बस जळून खाक झाली. क्षणार्धात बसने पेट घेतल्याने नागरिकांची भंबेरी उडाली होती. हीच घटना जर धावत्या बसमध्ये घडली असती तर मोठी जिवीतहानी होण्याचा धोका उद्भवला असता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

Advertisement

  • मुळ दुखणे बाजूलाच

केएमटी बसेसची रोज देखभाल दुरूस्ती होत असली तरी बस चालविताना अनेक वेळा नियम पाळले जात नाहीत. रोजचा बसचा प्रवास 200 ते 220 किलोमिटरच्यावर होतो. त्यातच शहरातील चिंचोळे रस्ते, वाहतुकीच्या होणाऱ्या केंडीमुळे बस अधिक वेळ सुरू ठेवावी लागते. त्यामुळे वायरींग गरम होण्याचा धोका असतो. सर्व वायरींग उघड्यावर असल्याने कोटींग वितळल्यामुळे शॉर्ट सर्कीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अपुऱ्या बसेसचे मुळ दुखणे बाजूलाच राहत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

  • 15 वर्षाची मुदत, मात्र ओव्हरलोडमुळे आयुष्यमान कमी

सेंट्रल गर्व्हमेंटच्या नियमानुसार बसेसना 15 वर्षाची मुदत आहे. मात्र, त्या नियमाने बसचा वापर होणे गरजेचे आहे. ओव्हरलोड मुळे बसची विविध कामे निघत आहेत. त्यातच खराब रस्त्यांमुळे बसचा खुळखुळा होत आहे. तसेच बसवर रोज वेगवेगळे चालक असल्याने चालविण्यातही फरक पडत आहे. त्यामुळे बसचा मेंटनन्स वाढत आहे व आयुष्यमान कमी होत आहे

Advertisement
Tags :

.