महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहा आमदारांना दहा टक्के निधी हे दुर्देव ! निधी वितरणावर आमदार सतेज पाटील यांची नाराजी

03:51 PM Jan 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
MLA Satej Patil
Advertisement

‘सत्तारुढ निधी वितरण समिती’ नाव ठेवण्याची केली सूचना; जिल्हा नियोजन बैठकीत जाब विचारणार असल्याचा इशारा

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर जिह्यातील काँग्रेस पक्षाच्या सहा आमदारांना केवळ दहा टक्के निधी देणे हे जनतेच्या विरोधातील धोरण आहे. महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारने राज्यभरातील जिल्हा नियोजन समित्यांचे नाव बदलून आता ‘सत्तारूढ निधी वितरण समिती’ असे नाव ठेवावे असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर हल्ला चढवला.

Advertisement

सत्ताधारी म्हणून 5/10 टक्के निधी जादा घेणे समजू शकतो. परंतु सहा आमदारांना फक्त 10 टक्के निधी हे केवळ आणि केवळ दुर्दैवी आहे. याबाबत पालकमंत्र्यांना सर्व काँग्रेस आमदारांच्यावतीने पत्र दिले आहे. तसेच 8 जानेवारीला होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Next Article