'सीपीआर' मध्ये एकाच दिवशी ‘तावी’च्या तीन शस्त्रक्रिया
कोल्हापूर :
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित सीपीआर हॉस्पिटलमधील हृदयरोग शस्त्रक्रिया विभागाने एकाच दिवशी तावी तंत्राने तीन शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. 10 नोव्हेंबरला या शस्त्रक्रिया झाल्या. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रथमच एकाच दिवशी तीन ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक वॉल्व्ह इम्प्लांटेशन (ऊAन्घ्) शस्त्रक्रिया सेल्फ एक्सपांडेबल ड्राय टिश्यू ऊAन्न्घ् हार्ट व्हॉल्व्ह यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. एकाच दिवशी तीन अतिजोखमीच्या रुग्णांवर उपचार करून सीपीआर हॉस्पिटलने मोठे पाऊल उचलले असून, रुग्णसेवेत आधुनिक उपचारांची सुरुवात झाली आहे.
सीपीआरमधील या या शस्त्रक्रियांसाठी रिलिसिस इंडियाच्या पी अँड बी सेल्फ-एक्सपँडिंग ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक वाल्व्हचा वापर करण्यात आला. एका 86 वर्षीय पुरुष रूग्णाला वारंवार चक्कर येणे, धाप लागणे, हृदयाची धडधड वाढणे अश्य समस्या होत्या. तसेच 83 वर्षीय महिलेला सतत छातीत दुखणे, चक्कर, धाप लागणे आदीचा त्रास वाढतच चालला होता. एका 72 वर्षीय पुरुषाला उच्च रक्तदाब, मधुमेह, दीर्घकालीन किडनी विकार अशा गंभीर समस्या होत्या. या तिन्ही रुग्णांमध्ये अत्यंत गंभीर एऑर्टिक स्टेनोसिस (महाधमनी झडपीचे गंभीर झडप संकुचन) असे निदान झाले होते.
प्रत्येक रुग्णाची शस्त्रक्रिया ट्रान्सफेमोरल पद्धतीने, म्हणजेच मांडीतील धमनीतून छिद्र करून, करण्यात आली. या पद्धतीने कमी धोक्याने शस्त्रक्रिया करता येते आणि विशेषत: उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. या प्रक्रियेत 18-222 एम.एम. बलून वापरून एऑर्टिक वॉल्व्हचे (महाधमनी झडप) विस्तारीकरण करण्यात आले आणि नंतर महाधमनी स्तरावर बायोप्रोस्थेटिक वॉल्व्ह प्रत्यारोपित करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर त्वरित रुग्णांच्या हृदयातील रक्तदाबात सुधारणा झाली आणि हृदयाच्या पंपिंग कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली. 30 ते 35 टक्क्यांवरून 55 टक्क्यापर्यंत सुधारली. दुसऱ्याच दिवशी रुग्णांना चालायला लावले गेले, हे या प्रक्रियेच्या यशाचे एक महत्त्वपूर्ण लक्षण होते.
या प्रक्रियेचा खर्च 14 ते 16 लाखांपर्यंत असतो, मात्र सीपीआर हॉस्पिटलने या शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य सेवेच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पाडल्या. या महत्त्वपूर्ण यशामागे लिथुआनियाचे डॉ. कासपरास ब्रायडिस, डॉ. अक्षय बाफना (विभागप्रमुख, हृदयरोग विभाग), शासकीय र्वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे आणि रिलिसिस इंडियाचे सहकार्य लाभले. सीपीआर हॉस्पिटल टीमसाठी अशी उच्च जोखीम प्रक्रिया कोणत्याही चीरफाड न करता, स्युचरलेस बिनाटाक्याचे आणि अशा गंभीर रुग्णांवर स्थानिक भूल देऊन करणे ही खरोखरच आभिमानास्पद गोष्ट आहे.
या शस्त्रक्रियासाठी अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. अक्षय बाफना, डॉ. कोटणीस, डॉ. कासपरास ब्रायडिस, सहयोगी प्राध्यापक डॉ. राज दिवेदी, मुख्य भुलतज्ञ डॉ. राऊत यांचे आभार मानले.
डॉ. विदूर कर्णिक, डॉ. स्फुर्ती जाधव व डॉ. अजित हांगे, डॉ. अदीब शेख, डॉ निखील गडदे (कार्डिओलॉजी वरीष्ठ निवासी) डॉ भूपेंद्र पाटील, डॉ. माजित मुल्ला, डॉ. किशोर देवरे (हृदय शल्यचिकित्सक विभाग), डॉ. गणेश देसाई आणि टीम (अॅनेस्थेटिस्ट), वरिष्ठ कॅथलॅब तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, वैष्णवी राजेंद्र, नर्सिंग इन्चार्ज मधुरा जावडेकर, रेखा पाटील, सायली पवार, कॅथलॅब स्टाफ प्रिया माने, श्रीकांत पाटील, अमृता रोहम, परविन अत्तार, शुभांगी करंबेकर, अवधूत जाधव व ओतरी याचे सहकार्य लाभले.