For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसवाण गल्ली गॅस दुर्घटनेतील दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू

10:50 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसवाण गल्ली गॅस दुर्घटनेतील दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

एकाच कुटुंबातील पाच जण झाले होते गंभीर जखमी

Advertisement

बेळगाव : गॅस सिलिंडरमधील गळतीमुळे आगीचा भडका उडून भाजून गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी दोघा जणांचा सोमवारी सकाळी खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. आणखी दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. हेमंत मोहन भट (वय 27), कमलाक्षी गोपालकृष्ण भट (वय 76) दोघेही रा. बसवाण गल्ली बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी बसवाण गल्ली येथील एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून सर्व जखमींना खासगी इस्पितळात हलविण्यात आले होते. ललिता मोहन भट (वय 48), मोहन गोपालकृष्ण भट (वय 46) व गोपालकृष्ण भट (वय 84) या तिघा जणांवर उपचार करण्यात येत आहेत. मोहन वगळता इतर चौघे जण 90 टक्क्यांहून अधिक भाजून जखमी झाले आहेत. दोन्ही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत. गॅस सिलिंडर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघा जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.