For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होनग्यातील बालिकेचा सिव्हिलमध्ये डेंग्यूसदृश आजाराने दुर्दैवी मृत्यू

06:31 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
होनग्यातील बालिकेचा सिव्हिलमध्ये डेंग्यूसदृश आजाराने दुर्दैवी मृत्यू
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

डेंग्यूसदृश आजाराने 14 वर्षीय बालिकेचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोनी यांनी घटनास्थळी भेट दिली.

होनगा येथील प्रणाली परशराम हुंदरे (वय 14) असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. तिला गुरुवारी ताप आल्याने उपचारासाठी शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला न्युमोनिया व फुफ्फुसाला संसर्ग झाल्याचे निदान झाले. उपचार करूनही उपयोग झाला नाही. यावेळी प्रणालीच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकत होता.

Advertisement

डेंग्यूबाबत नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक

सदर बालिकेचा मृत्यू डेंग्यूसदृश आजाराने झाला आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात आवश्यक ते उपचार करण्यात येत होते. मात्र, न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने तिने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सदर बालिकेच्या कुटुंबीयांची समजूत घालण्यात आली आहे. डेंग्यू आजाराबाबत नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. महेश कोनी (जिल्हा आरोग्याधिकारी)

Advertisement
Tags :

.