महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संदेशखाली : बालअधिकार समितीची भेट

06:33 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता 

Advertisement

पश्चिम बंगाल मधील संदेशखाली या शहरात दलित आणि मागासवर्गिय समाजातील महिला आणि मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणाची गंभीर नोंद राज्याच्या बालअधिकार समितीने घेतली असून या समितीच्या सदस्यांनी या शहराला भेट दिली आहे. समितीच्या सदस्यांनी परिस्थितीची पाहणी केली. तसेच पिडित महिला आणि मुलींशी त्यांनी चर्चाही केल्याचे वृत्त आहे.

Advertisement

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात पक्षाच्या सहा सदस्यांनीही संदेशखालीचा दौरा करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, प्रशासनाने त्यांना अनुमती नाकारली आहे. भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध केला असून संदेशखालीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि येथील तृणमूल नेते शहाजहान यांनी केलेल्या अत्याचारांचे बिंग बाहेर पडू नये, म्हणूनच आमच्या पक्षाच्या नेत्यांना तेथे जाऊ देण्यात येत नाही, असा आरोप केला आहे. संदेशखाली प्रकरण गेले पंधरा दिवस चांगलेच गाजत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article