For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मराठी माणूस ताठ मानेने राहील

03:14 PM Jun 19, 2025 IST | Radhika Patil
फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मराठी माणूस ताठ मानेने राहील
Advertisement

सातारा :

Advertisement

मुंबईच काय अख्खा महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे. महाराष्ट्रात अठरापगड जाती गुण्या गोविंदाने राहतात. विरोधकांना महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने मुद्दा राहिला नसल्याने जातीचे, भाषेचे द्वेषाचे राजकारण केले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतला, महाराष्ट्रातला मराठी माणूस ताठ मानेने काम करत राहणार, असा ठाम विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम विभागाला दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परवाच राज्यातील सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुन्हा एकदा पुलांच्या स्ट्रॅक्चरला ऑडिट करुन घ्यावे आणि त्याचा अहवाल मंत्रालयाकडे पाठवावा, एखादा पूल धोकादायक झाला असेल तर पर्यायी वाहतूक व्यवस्था करुन तो पूल बंद करावा. सिमेंट कॉक्रिटचे बोर्ड करुन तो पूल वापरा करता बंद करावा, तिथले स्थानिक प्राधिकरण असेल तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यांना कळवावे, पोलिसांचे लक्ष राहिले पाहिजे. बंद असलेल्या पुलांवरुन टु व्हिलर जात असतील तर त्यावर कार्यवाही झाली तर कायमचा वाहतुकीला बंद राहिल. ज्या काही किरकोळ दुरुस्त्या असतील त्या कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. पुलांच्या मेंटन्सला मान्यता दिली आहे. राज्यात 24 वर्षाच्या पुल आहेत तर काही ब्रिटीशकालीन पूल आहेत. त्याचा रिपोर्ट मागितला आहे. काही पुलाचे बेरिंग बदलणे, गॅप काढणे ही कामे करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बैठक घेवून दोन्ही नॅशनल हायवेच्या अभियंत्यांशी चर्चा केली आहे. इंदापूर आणि माणगावच्या बायपासची कामे करण्यासाठी वेळ लागणार आहे. काही महिन्यापुर्वीच ई टेडरींग प्रक्रिया झाली आहे. ही कामे करताना सर्व्हिस रोड करुन वाहतूक सुरळीत ठेवून काम करा, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच परशुराम घाटात भूसख्खलन झाले आहे. ते हटवण्याचे काम सुरु आहे. तेथे वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कशेडी टनेलला गळती झाली असेल ती थांबवण्यात यावी, असे सुचित केले आहे. टनेलला कोणताही धोका नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Advertisement

पुढे कराड चिपळूण मार्गाच्या प्रश्नावर ते म्हणाले, तिथली माहिती घेतली आहे. कराड-चिपळुण नॅशनल हायवे काम सुरु आहे. तिथे पाऊस जास्त झाल्याने तात्पुरता रस्ता वाहून गेल्याची बातमी आली होती. तेथील काम करुन वाहतूक सुरु करण्यात आली. त्याचबरोबर मुख्य पुलांची कामे कशी कपलीट करता येतील. त्याच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षी पाऊस मोठा आहे. अजून जुलै, ऑगस्ट हे पावसाचे महिने आहेत, असे ते सांगत ते म्हणाले, पुण्याच्या अभियंत्यांना विचारले धोकादायक पुल किती तर त्यांनी 17 ते 18 पूल धोकादायक असे सांगितले. त्यांना अशी मोघम माहिती देवू नका, डिटेल स्टॅक्चरल ऑडीटचा रिपोर्ट द्या, असे सुचित केले आहे. तसेच कोकणातील संगमेश्वरच्या इथले काम मागे पडले आहे.. तिथे चिखल होत होता तो विषय क्लिअर केला आहे. कुठेही वाहतूक अडकू नये म्हणून मुरमीकरणाचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

  • इंद्रायणी पुलाबाबत कारवाई होणार

इंद्रायणी पुलाच्या कामास विलंब होत असल्याचा प्रश्न छेडला असता ते म्हणाले, रवींद्र चव्हाण मंत्री असताना इंद्रायणी पुलाला निधी दिला होता. टेंडर होवून दिरंगाई झाली आहे. त्याबाबत सगळे डिटेल्स मागवले आहेत. मंत्रालयातू न सूचना दिली आहे. त्याचा अहवाल आल्यावर स्व्रुटनी करुन त्या कामात मुद्दामहून दिरंगाई झाली की तांत्रिक अडचण होती ते पाहिले जाईल. विषय गंभीर आहे. तेथे चार पाच लोकांचे प्राण गेले आहेत. हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा नाही. मुद्दामहून कामात उशिर केल्याचे आढळून आल्यास, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, अशी ग्वाही त्यांनी त्यांनी दिली.

  • भाजप सर्वसामान्यांना केंद्रबिंदू माणून काम करणारा पक्ष

पडळकर यांच्याबाबत प्रश्न छेडला असता ते म्हणाले, मला त्यांचे विधान माहिती नाही. परंतु कोणीच कोणावर जबरदस्ती करु शकत नाही. एखाद्याचे समंती असेल ती गोष्ट वेगळी आहे, असे त्यांनी उत्तर दिले. पुढे ते म्हणाले, आज देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. केंद्रात मोदींजींचे 11 वर्ष पंतप्रधान म्हणून काम बघितले आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला गुडघ्यावर येवून थांबावे लागले. आज देशाची इकॉनॉमी चौथ्या क्रमांकावर आहे. लोकांचा विश्वास आहे. भाजपा सर्वसामान्यांना केंद्रबिंदू माणून काम करणारा पक्ष आहे. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. चांगली लोक आहेत आहेत म्हणून पक्ष प्रवेश होत आहेत. राज्यातील मराठी माणूस देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ताठ माने काम करत राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.