Miraj : मिरज दिंडीवेस परिसरातील खोक्यांची अनधिकृत हटवली अतिक्रमणे
मिरज महापालिकेने सार्वजनिक जागा सुरक्षितेसाठी उचलले ठोस पाऊल
मिरज : शहरातील दिंडीवेस येथे रस्त्याकडेला अनधिकृतपणे थाटलेल्या खोक्यांच्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई केली. सर्व अतिक्रमणे जप्त करुन संबंधितांना नोटीसा देण्यात आल्या. फळे विक्रीच्या बहाण्याने येथे हातगाड्यांसह पानटपऱ्यांची अतिक्रमणे थाटली होती. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने कारवाई मोहिम राबवून रस्ता अतिक्रमणमुक्त केला.
मालगाव रस्त्यावरील दिंडीवेस परिसरात सार्वजनिक जागेवर काही फळ विक्रेते व पानपट्टी चालकांनी अनधिकृत बस्तान बसवले. सुरूवातीला छत्री लावून व्यवसाय सुरू होता. त्यानंतर हातगाडी लावली. आता तर हातगाडीच्या जागी चक्क खोकी उभारली होती. यामुळे मालगाव रस्त्यावर अतिक्रमणांनी हातपाय पसरल्याचे दिसून आले. वाहनधारक व विद्यार्थ्यांनाही या अतिक्रमणाचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. 1. सदर अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी होती.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी बा अतिक्रमण विभागाच्या शोभित कांबळेसह पथकाला- पाचारण करुन अतिक्रमण हटविण्यास सांगितले. त्यानुसार या मार्गावरील खोक्यांची अतिक्रमणे हटवण्यात आली. काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या, पानपट्टी, मावे विकणाऱ्यांच्या गाड्या, खोकी यामुळे दिंडीच्या वळणावर प्रवास धोकादायक बनला होता.
सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी त्यांना दिलेल्या माहितीची गंभीरपणे दखल घेत तातडीने अतिक्रमणे हटवण्याची सूचना केली. त्यानुसार या सूचनेची अंमलबजावणी झाली. या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. दरम्यान, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सूचनेची गंभीरपणे दखल घेतली. अतिक्रमण निर्मूलनचे शोभित कांबळे यांनी कारवाई करून नागरिकांना दिलासा दिला. या दोघांचे परिसरात कौतुक होत आहे. कारवाईमध्ये सातत्य असावे अशी अपेक्षा भाजपच्या महिला सदस्या अनुजा कपूर यांनी व्यक्त केली.