खाऊगल्लीतील अनधिकृत केबिन हटविल्या
कोल्हापूर :
कळंबा खाऊ गल्ली येथील अनधिकृत अकरा केबिन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढली. रविवारी घडलेल्या घटने नंतर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. कळंबा साई मंदिर परिसरात नेहमीच वर्दळ असते.कोल्हापूर गारगोटी महामार्गाला लागून साई मंदिर मुख्य चौकातील बेकायदा आकरा केबिन या रस्त्यावरील अतिक्रमणे सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने 11 अनधिकृत खाद्यपदार्थ हात गाड्या व टपऱ्यांवरही कारवाई केली.
कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गा व रिंगरोड मार्गे राधनागरील जाणारी वाहतूक ही मोठया प्रमाणत असते. त्यामुळे ब्रयाचदा या मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली. वाहतुकीला अडथळा निर्माण करण्राया कळंबा रिंग रोड व साई मंदिर मुख्य चौकातील बेकायदा आकरा केबिन महापालिका अतिक्रमण विभागाने बाजूला हटवल्या असून सोमवारी येथील चौकांने मुक्त श्वास घेतला आहे. रविवार मुख्य रस्त्यावर पार्किंग केलेला ट्रक न्यूट्रल होऊन येतील अनेक टप्रयावरती घुसला होता. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने व अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कळंबा रिंग रोड, साई मंदिर चौक व उपनगरातील अनेक ठिकाणी अनधिकृत केबिनची माहिती घेतली असून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व बेकायदेशीर केबिन तात्काळ हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कळंबा रिंग रोड व साई मंदिर चौकात खाद्यपदार्थांचे स्टॉल, हार, फळ, वस्तू विक्रेते यांच्या केबिन लावण्यात आलेल्या आहेत. यामधील अनेक स्टॉल धारकाकडे परवाने नाहीत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी या केबिन लावण्यात आल्या आहेत. हा रिंग रोड दोन राज्यमहामार्गासह उपनगराला जोडणार आहे त्यामुळे शेकडो वाहनांची दररोज वर्दळ सुरू असते. त्यामुळे अपघाताचे अनेक प्रसंग घडले आहेत. याबाबत येथील नागरिकांनी महापालिका अतिक्रमण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची चित्र आहे.
महापालिका प्रशासक आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने व सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबा रिंग रोड, साई मंदिर चौक व उपनगरातील बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल व केबिन रोडसोबत आता शहरातील सर्वच मुख्य मार्गांवर कारवाई करण्यात येत आहे. हातगाडे, केबिन्सचे अतिक्रमण, फूटपाथवरील विक्रेत्यांचे अतिक्रमण, पार्किंगच्या ठिकाणी उभे करण्यात आलेले हातगाडे अशा सर्व बेकायदा केबिन्सवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
विलास साळोखे अतिक्रमण विभाग प्रमुख