Satara News : दोष सिद्धीत उंब्रज पोलीस ठाणे जिल्ह्यात अब्बल
अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
उंब्रज : सातारा जिल्हा पोलीस दलात उंब्रज पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपली छाप निर्माण केली आहे. ऑक्टोबर २०२५ या महिन्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, कराड यांनी दिलेल्या निकालांमध्ये सर्वाधिक दोष सिद्धी मिळवत उंब्रज पोलीस ठाण्याने संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा मान पटकावला.
गुन्हे उकलण्यात अचूक तपास, पुराव्यांचे काटेकोर संकलन आणि न्यायालयीन प्रक्रियेत दाखवलेली तत्परता या सर्वांचा परिणाम म्हणून उंब्रज पोलिसांना हा सन्मान पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते देण्यात आला.
अपराध्यांना शिक्षा होण्यासाठी तपास कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण ठरलेली ही कामगिरी केवळ एका ठाण्याचा सन्मान नसून संपूर्ण सातारा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे प्रतिबिंब आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने गुन्हे सिद्ध करण्याची प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, विशेषतः सहाय्यक निरीक्षक रवींद्र भोरे व अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरवले.
: