महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जामिनासाठी उमर खालिदची उच्च न्यायालयात धाव

06:45 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

याचिकेवर सोमवारी होणार सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली दंगलीशी निगडित  युएपीए अंतर्गत नोंद गुन्ह्याप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदने जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खालिदच्या याचिकेवर सोमवारी न्यायाधीश प्रतिमा सिंह आणि अमित शर्मा यांचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. खालिदची दुसरी जामीन याचिका 28 मे रोजी सत्र न्यायालयाने फेटाळली होती.  कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उमर खालिदने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून दिलाशाची मागणी करणारी स्वत:ची याचिका मागे घेतल्यावर खालिदने नवी जामीन याचिका दाखल केली हीत. खालिदने ऑक्टोबर 2022 मध्ये जामिनास नकार देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला यापूर्वी आव्हान दिले होते.

खालिद, शरजील इमाम आणि अन्य आरोपींवर फेब्रुवारी 2020 मधील दंगलीचे सूत्रधार असण्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंद आहे. या दंगलीत 53 जणांचा मृत्यू झाला होता आणि 700 हून अधिक जण जखमी झाले होते. सीएए आणि एनआरसी विरोधातील निदर्शनांदरम्यान हिंसा भडकली होती. खालिदला सप्टेंबर 2020 मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article