महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

2 ऑगस्टला झळकणार ‘उलझ’

06:25 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जान्हवी कपूरच्या चाहत्यांना तिचा आगामी चित्रपट ‘उलझ’ची मोठी प्रतीक्षा लागून राहिली आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

Advertisement

उलझ आता 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जान्हवीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. या चित्रपटात जान्हवी ही भारतीय वन अधिकारी म्हणजेच आयएफएसची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कहाणी देशभक्तीवर आधारित असणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत गुलशन देवैया, राजेश तैलंग, रोशन मॅथ्यू, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी समवेत अनेक कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी जान्हवी कपूरचा उलझ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 15 ऑगस्ट रोजी 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात जॉन अब्राहमचा ‘वेदा’, अक्षय कुमार आणि तापसी पन्नूचा ‘खेल खेल में’ आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्राr 2’ सामील आहे. अशा स्थितीत जान्हवीच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागू शकते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article