For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रात गुंडाराज...सरकारचं अभिनंदन; विरोधकांची सरकारवर टिकेची झोड

06:03 PM Feb 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
महाराष्ट्रात गुंडाराज   सरकारचं अभिनंदन  विरोधकांची सरकारवर टिकेची झोड
Nilesh Ghaywal
Advertisement

ठाण्यातील उल्हासनगर पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणानंतर राजकारणातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. या बरोबरच राज्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महाविकास आघाडीने सरकारवर गुंडगीरीला आश्रय देत असल्याचा आरोप केला. आता यामध्ये आणखी भर पडली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पुण्यातील एका गुंडांचा फोटो आणि त्या गुंडानेच मंत्रालयाच्या आवारात केलेले रील पोस्ट करून सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर लगेच विजय वडेट्टीवार यांनी गुंड निलेश घायवळ यांचे मंत्रालय परिसरातील रील्स टाकून सरकारवर टिका केली आहे,

Advertisement

उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणानंतर महाविकास आघाडीने सरकार गुंडाना संरक्षण देत असल्याचा आरोप करत आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर सातत्याने टिका करत सोशल मीडीयावरील फोटोंचा दाखला देत हे सरकार गुंडाराजला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला आहे.

यापुर्वीही खासदार संजय राऊत यांनी मुंख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवशी कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेतल्याचा फोटो आपल्या एक्स या सोशल मीडीयावर पोस्ट केले होते. तसेच या फोटोंच्या माध्यमातून राज्यात गुंडाराज चालु असल्याचंही त्यांनी आरोप केला होता.

Advertisement

आज पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे फोटो खासदार संजय राऊत यांनी शेअऱ केले आहेत. या पोस्टमध्ये लिहीताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात गुंडा राज सूरू आहे. हे महाशय कोण आहेत ? त्यांचे नेमके कर्तुत्व काय ? याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. पण मोदी- शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने आज काय अवस्था करून ठेवली आहे." असा थेट हल्ला संजय राऊतांनी केला होता.

त्यानंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर जोरदार टिका केली आहे. आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुण्यातील गुंड निलेश घायवळची रिल्स शेअर करताना वडेट्टीवारांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश घायवळचा मंत्रालयातील परिसरात तयार केलेला व्हिडीयो शेअर करतान विजय वडेट्टीवार म्हणाले, "एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहावे लागते, तर दुसरीकडे सरकारने गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केली आहे. गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन. " असाही टोला वडेट्टीवार यांनी सरकारला लगावला आहे. तसेच राज्यातील पेपरफुटी विरोधात परिक्षार्थी विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. तर नागपुरात आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू असताना इकडे सरकारने गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून दिले आहे. त्यामुळे हीच का ती “मोदी की गॅरंटी” ? असा परखड सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Tags :

.