For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रंगबहार जीवन गौरव पुरस्कार श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीर

05:54 PM Jan 10, 2025 IST | Radhika Patil
रंगबहार जीवन गौरव पुरस्कार श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीर
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

यंदाचा जेष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार 2025 ज्येष्ठ कला संघटक श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीर झाला आहे. 19 जानेवारी रोजी टाऊन हॉल येथे सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ शरद भुताडिया यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे.

श्रीकांत डिग्रजकर हे सांगीतिक पार्श्वभूमी लाभलेल्या जयपूर घराण्याचे ख्यातकिर्त कलाकार जेष्ठ गानगुरू पं. सुधाकर बुवा डिग्रजकर यांच्याकडे गाणी शिकण्याचा प्रयत्न केला. पण तबला वादनाची आवड असल्याने गुरूवर्य कै. केशवराव धर्माधिकारी यांचेकडे तबला शिक्षणास सुरूवात केली. तसेच कै. पं. निवृत्तीबुवा सरनाईक, बुजुर्ग तबलावादक उस्ताद कै. गणपतराव कवठेकर, कै. यशवंत अष्टेकर यांच्याकडून तबला वादनातील गुपिते, विकास या विषयी शिक्षण घेतले. 1975 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सहवासात त्यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन व स्वीय सहाय्यकपदी म्हणून काम केले. तसेच जयप्रभा स्टुडियोचे महा व्यवस्थापकही होते. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर, सुधीर फडके, व्ही. शांताराम, सुलोचना, विश्राम बेडेकर, गं. दि. माडगूळकर, बाबा आमटे यासारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. त्यानंतर गायन समाज देवल क्लबच्या कार्यकारी मंडळामध्ये 1999 ते आजअखेर गेली 25 वर्षे विश्वस्त व संचालक पदावर कार्यरत असून, संगीत संमेलने, महोत्सव व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले व संस्थेच्या कला संकुलाचे अडीच कोटीचे काम पूर्ण केले. कोल्हापूरातील ज्येष्ठ चित्रकार व लेखक कै. श्यामकान्त जाधव यांनी स्थापन केलेल्या रंगबहार या संस्थेच्या स्थापनेपासून सहकारी, संस्थेचे कार्यवाह ते पाच वर्षे संस्थेचे अध्यक्षपद ही सांभाळले. रंगबहारच्या माध्यमातून मान्यवर कलाकार यांचे बरोबर उदयोन्मुख चित्रकारांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, व्याख्याने, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने, कवि संमेलने, चित्रकला स्पर्धा घेतल्या. मैफल रंग सुरांची या अभिनव उपक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तसेच बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे सदस्य म्हणून अनेक वर्षे कार्यरत आहेत. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र या संस्थेचे सुरूवातीपासून कार्यवाह आहेत. देवल क्लबच्या वतीने संगीत विषयावरील विश्वकोश निर्मितीसाठी 18 ते 20 लेखांचे लिखान केले. तसेच संगीत, नाट्या, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर यांच्याविषयी वृत्तपत्रामधून नियमित लेखन, मराठी संगीत, शास्त्राrय संगीत, मराठी संस्कृती, चित्रकला, सिनेमा, नाटक, लेखन, जुना महाराष्ट्र, जुने कोल्हापूर, कोल्हापूर संस्थान, एकूण कला, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रात गेली 70 हून अधिक वर्षे त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.