For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आदिवासींतर्फे ‘उलगुलान’ आंदोलन इशारा

12:17 PM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
आदिवासींतर्फे ‘उलगुलान’ आंदोलन इशारा
Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी हवे राजकीय आराक्षण : 16 एसटी संघटना सभेत सहभागी

Advertisement

पणजी : गोव्यातील अनुसुचित जमातींच्या (एसटी) ‘मिशन पोलिटिकल रिझर्व्हेशन’तर्फे राजधानी पणजीत काल बुधवारी आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेतून ‘उलगुलान’ आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले. गोव्यातील 16 एसटी संघटना त्या सभेत सहभागी झाल्या होत्या. आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी राखीव मतदारसंघ जाहीर करावेत, अशी मागणी सभेतून करण्यात आली. मागणी लोकसभा निवडणुकीपूर्वी मान्य न झाल्यास त्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही सभेतून देण्यात आला. एसटी समाजातील अनेक नेत्यांची सभेत भाषणे झाली. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सरकारवर टीका केली.

वक्त्यांचा सरकारवर हल्लाबोल

Advertisement

एसटीच्या मागण्या वेळोवेळी सरकार दरबारी मांडण्यात आल्या. निवेदने देण्यात आली. परंतु त्याला सावंत व त्यांच्या सरकारने प्रतिसाद दिला नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही, असे आरोप वक्त्यांनी केले. फक्त आश्वासने देण्यात आली. परंतु त्यांची पुर्तता सरकारने केली नाही, असे सांगून सर्व नेत्यांनी सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला. आझाद मैदानावरील या सभेला गोव्याच्या कानाकोपऱ्यातून एसटी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. या सभेला एकंदिरीत चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती यशस्वी झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न

सभेचा समारोप करताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन निवेदन देण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले. त्यास उपस्थित लोकांनी प्रतिसाद दिला. सर्वानी रांगेतून शिस्तीने जावे असेही सांगण्यात आले. त्या आवाहनानंतर तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांची धावपळ उडाली.

नेत्यांनी बदलला पवित्रा

एवढ्या मोठ्या संख्येने लोक तेथे गेले तर मोठा गेंधळ होणार असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी आझाद मैदानाची दारे बंद केली. त्यांना बंगल्याकडे जाण्यापासून रोखले. नंतर सभेच्या आयोजक नेत्यांनी पवित्रा बदलला आणि प्रथम सभापती रमेश तवडकर यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. लोक बंगल्याकडे जाणार नसल्याची खात्री होताच पोलिसांनी दारे खुली करून लोकांना जाऊ दिले.

Advertisement
Tags :

.